अंकिता लोखंडेनं सांगितलं पवित्र रिश्ता मालिकेच्या शूटिंगबाबत

अंकिता लोखंडेनं सांगितलं पवित्र रिश्ता मालिकेच्या शूटिंगबाबत

[ad_1]

Ankita Lokhande Recalls Pavitra Rishta Days: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेक वेळा चर्चेत असते. अंकिताला पवित्र रिश्ता या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिनं अर्चना ही भूमिका साकारली आहे.पवित्र रिश्ता या मालिकेतील अर्चना आणि  मानव  यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अंकिताने नुकत्याच एका मुलाखतीत पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटबाबत तसेच या मालिकेचं शूटिंग करताना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.  

मुलाखतीत अंकितानं सांगितलं, ‘पवित्र रिश्ता मालिकेसाठी मी नॉन-स्टॉप शूट केले. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी मी जेवढे काम केले आहे, तेवढे काम मी आयुष्यात कधीही केले नाही. मला आठवते की, मी तीन महिने घरी गेले नव्हते आणि सेटवर रात्र दिवस शूटिंग करत होतो. सेटवर जेंट्स वॉशरूम होते.मी तिथे आंघोळ करायचे आणि माझ्या शूटिंगसाठी तयार व्हायचे. त्यावेळी माझी एक हेयरड्रेसर होती, अस्मिता मला कपडे इस्त्री करायला मदत करायची. एकदा मी 148 तास सतत शूट केले होते.’

 ‘पवित्र रिश्ता’ मधील अर्चनाची ही भूमिका कशी मिळाली? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, पवित्र रिश्ताच्या ऑडिशनसाठी कॉल आला होता आणि मी ऑडिशनला गेले होते. मला या भूमिकेबद्दल काहीच माहिती नव्हती. एका मराठी मुलीची भूमिका आहे एवढंच मला माहित होतं. मला आठवते की, ऑडिशनला जाताना मी कपाळावर टिकली लावली होती. ऑडिशन तितकीशी चांगली झाली नाही पण  एकता मॅडमला मी आवडले. पुढच्या 5 दिवसात मी फायनल झाले.’

 ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput)  मानव ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील सुशांत आणि अंकिताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मानव आणि अर्चना यांची लव्ह स्टोरी या मालिकेत दाखण्यात आली होती. ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

14 Years Of Pavitra Rishta: ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला झाली 14 वर्ष; अंकिता लोखंडेची खास पोस्ट, सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *