अंबानीच्या सूनेनं भर कार्यक्रमात एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!

अंबानीच्या सूनेनं भर कार्यक्रमात एकच शब्द किंग खानला वापरला अन् अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा!

[ad_1]

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंगचा दिमाखदार कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) हजेरी लावली होती. प्री-वेडिंग होस्ट करण्याची जबाबदारी शाहरुखकडे होती. या भर कार्यक्रमात अंबानींच्या सूनेनं किंग खानला ‘काका’ अशी हाक मारली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या याच गोष्टीची चर्चा सुरू आहे.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचा शाहरुख खान होस्ट होता. कार्यक्रमाच्या मंचावर शाहरुखने अनंत आणि राधिकासोबत संवाद साधला. दरम्यान अनंत-राधिकाने एकमेकांना प्रेमाची कबुलीदेखील दिली. आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राधिका किंग खानला ‘काका’ अशी हाक मारताना दिसत आहे.

राधिका काय म्हणाली?

राधिका व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणत आहे,”शाहरुख काका..  आज तुम्ही इथे आहात तर तुमच्या सिनेमातील एक डायलॉग बोलते”. त्यानंतर शाहरुख मजेशीर अंदाजात म्हणतो,”आता समोर अक्षय असता तर तू अक्षय कुमारच्या सिनेमातला डायलॉग बोलली असतीस? अक्की प्रेमाने म्हणतोय रे”. 

राधिका एसआरकेचा डायलॉग म्हणते,”इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है, जर्रे-जर्रेने मुझे तुमचे मिलाने की साजिश की है”. शाहरुख म्हणतो,”गले लगाओ”.

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगने वेधलं जगाचं लक्ष

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांच्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने आपल्या गाण्याने उपस्थित असलेल्या मंडळींचं मनोरंजन केलं. दुसऱ्या दिवशी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, दिलजीत दोसांझने खास सादरीकरण केलं. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी प्री-वेडिंगला उपस्थित होते.

दिव्यांची रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट, भव्य स्टेज आणि दिग्गज मंडळी यांमुळे अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंगचा सोहळा हा दिमाखदार झाला. 1 ते 3 मार्च दरम्यान या गुजरातमधील जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स, ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग, ‘ब्लॅकरॉक’चे सीईओ लॅरी फिंक, ‘ब्लॅकस्टोन’चे संस्थापक स्टीफन श्वार्झमन, ‘मॉर्गन स्टॅन्ले’चे सीईओ टेड पिक, ‘बँक ऑफ अमेरिके’चे अध्यक्ष ब्रायन थॉमस मॉयनीहॅन, ‘डिस्ने’चे सीईओ बॉब एग्नर आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांक ट्रम्प ही मंडळी देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होती. 

संबंधित बातम्या

प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधून मोठा व्यवसाय, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी किती खर्च?

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *