अजिंक्य देव आईच्या आठवणीत भावूक, शेअर केला व्हिडीओ

[ad_1]

Ajinkya Deo:  ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. अनेक सेलिब्रिटींनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरच्या माध्यमातून सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली.  सीमा देव यांचे पूत्र अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी  नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एक कविता सादर करताना दिसत आहेत. 

अजिंक्य देव हे आईच्या आठवणीत भावूक झाले आहेत. नुकताच अजिंक्य यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणातात,  “भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही. सावली होऊन सतत साथ देणारी माय आता भेटत नाही.” या व्हिडीओला त्यांनी ‘आई’ असं कॅप्शन दिलं आहे.

अजिंक्य देव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,’आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,’आई ती आईच असते सर …’ 

पाहा व्हिडीओ:


अजिंक्य देव यांनी काही दिवसांपूर्वी वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं, , ‘आई बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्‍त आठवणी… सुंदर गोड आठवणी’


सीमा देव आणि रमेश देव यांनी  1 जुलै, 1963 रोजी लग्नगाठ बांधली.  रमेश देव  यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. तर सीमा देव  यांचे 24  ऑगस्ट रोजी निधन झाले. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केले होते. 

सीमा देव आणि रमेश देव यांचे पूत्र अजिंक्य देव हे देखील अभिनय क्षेत्रात काम करतात.  हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.  अर्धांगी या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वहिनीची माया,माझे घर माझा संसार,जीवसखा,वाजवा रे वाजवा या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

संबंधित बातम्या :

Ajinkya Deo: सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘आई बाबा दोघेही गेले…’

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *