[ad_1]
Malhar Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सहमतीनेच आम्ही भाजपात (BJP) आलो होतो. अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपमध्ये पाठवलं आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्याचा गौप्यस्फोट मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी केला. मल्हार पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र आहेत. अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना मल्हार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
नेमकं काय म्हणाले मल्हार पाटील?
राष्ट्रवादीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ. पद्मसिंह पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मल्हार पाटील म्हणाले. अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवले व नंतर ते स्वतः भाजपसोबत आल्याचे मल्हार पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडल्याचे पाटील म्हणाले. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link