ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या डोक्यात रक्ताची गाठ, त्यामळे डॉक्टरांनी त्यांना 24 तास रुग्णालयात आराम करण्याचा दिला सल्ला.
राळेगणसिद्धीमधील सात दिवसांच्या उपोषणानंतर अण्णांना अशक्तपण जाणवत होता. त्यांची तब्येतही बरी नव्हती. त्यातच अचानक अण्णांच्या डाव्या हाताला मुंग्या येत असल्यामुळे त्यांना अहमदनगरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अण्णांच्या तपासण्या केल्यानंतर माहिती समोर आली.