अमरावतीनंतर आता नगरमध्येही महायुतीला धक्का, बच्चू कडू निलेश लंकेंना बळ पुरवणार? सूचक विधानामुळे चर्चेला उधाण!

[ad_1]

अहमदनगर : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti) अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. बच्चू कडू महायुतीचे (Mahayuti) भाग आहेत. मात्र तरीदेखील त्यांनी महायुतीच्याच उमेदवार राण यांना थेट विरोध केल आहे. ब्रह्मदेव आला तरी आम्ही तेथून माघार घेणार नाही, असं कडू म्हणालेत. दरम्यान, अमरावतीनंतर आता बच्चू कडू अहमदनगरच्या रुपात महायुतीला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. ते  अहमदनगरचे महाविकास आघडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या मागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना तसं सूचक विधान कडू यांनी केलं आहे. 

काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत

बच्चू कडू प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी बैठका घेत आहेत. बैठकांच्या माध्यमातून ते स्थानिक परिस्थिती समजून घेत आहेत. त्यांनी 30 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अहमदनगर या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं. प्रत्येक जिल्ह्यातील काही कार्यकर्ते असं सांगत आहे की आम्हाला भरपूर त्रास झाला आहे. काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत. त्यामुळे हा सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावं लागणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

कडू यांचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करणार का?

बच्चू कडू यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसं पाहायचं झाल्यास अहमदनगरमध्ये कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची फारशी ताकद नाहीत. मात्र स्थानिक राजकारणाक या पक्षाचे नेते विखे घराण्याला विरोध करतात. असे असताना निलेश लंके हे चांगले आहेत, असं मला कार्यकर्ते सांगत आहेत, असं विधान कडू यांनी केलं आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये कडू यांचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

…तर अहमदनगरमध्येही महायुतीला धक्का 

दरम्यान, बच्चू कडू यांनी याबाबत असा कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र कडू यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास हा एकाप्रकारे महायुतीला धक्काच असल्याचे म्हटले जात आहे. कारण अमरावतीमध्ये कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना थेट विरोध केला आहे. मी एकवेळ महायुतीतून बाहेर पडेन पण माघार घेणार नाही, असं कडू म्हणाले आहेत. त्यामुळे कडू महायुतीची साथ सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार

दरम्यान, या प्रश्नांची उत्तरं काही दिवसांत स्पष्ट होतीलच. पण कडू यांच्या भूमिकेमुळे नवनीत राणा यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तर अहमदनगरमध्ये कडू यांनी लंके यांना पाठिंबा दिल्यास तेथील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *