अहमदनगर: भाजप नगरसेवकाची रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

महापालिकेत सभागृह नेते असलेले भाजपचे नगरसेवक शिंदे यांच्या महापालिकेतील केबिनमध्ये ही मारहाण झाली. फिर्यादी हा मूळचा नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावचा रहिवासी आहे. तो साईदीप हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहे. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर ड्युटी करत असताना तीन अज्ञातांनी बळजबरीने गाडीत बसवून त्याला अहमदनगर महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर स्वप्नील शिंदे यांच्या केबिनमध्ये नेले. तिथं शिंदे व इतरांनी छत्तिसे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भैय्या संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊ दे. त्यास विरोध करू नको, नाहीतर तुझे हातपाय काढून घरी बसवू, अशी धमकीही दिली. कार्यालयातील अन्य लोकांनाही छत्तिसे याला मारण्यासाठी चिथावणी दिली. मारहाणीनंतर छत्तिसे यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवून रुग्णालयात सोडण्यात आले.

पोलीस तक्रार नोंदवायला तयार नव्हते!
मागील आठवड्यात हा मारहाणीचा प्रकार घडला. छत्तीसे हे पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेले होते. परंतु पोलिसांनी तक्रार नोंदविली नव्हती. त्यानंतर छत्तीसे यांनी थेट पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला चौकशीच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालय व महानगरपालिकेतील सीसीटीव्ही कमेऱ्यांचे फूटेज तपासले. त्यात शिंदे यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून छत्तीसे यांना नेतानाची दृश्ये आहेत. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *