आजारपणामुळे 30 किलो वजन वाढलं, अन्नपाणीही सोडलं; नागिन फेम अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्य संपलं…’

Mouni Roy talks about being body-shamed at the start of her career Bollywood Entertainment news in Marathi Bollywood Actress : आजारपणामुळे 30 किलो वजन वाढलं, अन्नपाणीही सोडलं; नागिन फेम अभिनेत्री म्हणाली,

[ad_1]

Bollywood Actress : कलाक्षेत्रात काम करताना प्रत्येक अभिनेत्रीला स्वत:च्या आरोग्याची आणि शरीराची काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा एखाद्या आजारपणातून बाहेर पडताना अभिनेत्रीचं वजन वाढतं आणि ते कमी करण्यासाठी मग त्या अभिनेत्रीची तारेवरची कसरत सुरु होते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिचा आहे. 

छोट्या पडद्यावरुन अभिनेत्री मौनी रॉय ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मौनी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. पण नागिन या मालिकेमुळे ती तिच्या कामामुळेही चर्चेत आली. नुकतच मौनीने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. 

‘अचानक 30 किलो वजन वाढलं’

मौनीने तिचा हा अनुभव सांगताना म्हटलं की, ‘जवळपास 7 ते 8 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी खूप आजारी पडले होते. बऱ्याच गोळ्या, पेनकिलर्स आणि औषधं घेत होते. त्यावेळी मला L4-L5 स्लिप डिस्क डिजनरेशन आणि कॅल्शियम स्टोन होता. या आजारामुळे मी जवळपास तीन महिने अंथरुणावरच होते. त्यामुळे माझं अचानक तीस किलो वजन वाढलं.’ 

‘मला वाटलं की माझं आयुष्य आता संपलं…’

पुढे मौनीने म्हटलं की, ‘मला तेव्हा खरंच असंच वाटलं की आता माझं आयुष्य संपलं. त्यावेळी मी लाईम लाईटमध्येही नव्हते. नंतर मी नागिन मालिका केली. तेव्हा एकच विचार मनात असायचा की, मी इतकं वजन कमी कसं करु? तेव्हा औषधं घेणंही बंद केलं होतं. त्यामुळे अर्ध वजन कमी झालं. त्यानंतर पाच दिवस फक्त ज्युसच प्यायले आणि त्यामुळे माझी चिडचिड होऊ लागील. कुणाशीही बोलण्याची इच्छा नसायची. तेव्हा मला जाणीव झाली की, आपण जेवण करायलं हवं. तेव्हाही एक अडचण झाली, मी खूप जास्त खायचे. तीन लोकांचे जेवण एकावेळी जेवायचे.’                                                               

ही बातमी वाचा : 

Mrunal Dusanis : ठरलं! ‘या’ वाहिनीवर होणार मृणाल दुसानिसचं कमबॅक, मालिकेचं नाव गुलदस्त्यात

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *