आज चतुर्ग्रही योगासह बनले अनेक शुभ योग; पाडव्याच्या मुहूर्तावर मेषसह ‘या’ 5 राशींना होणार धनलाभ, पगारवाढीचेही संकेत

[ad_1]

Astrology Today 8 April 2024 : आज सोमवार, 8 एप्रिलला चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शुक्र, राहू आणि सूर्य हे ग्रह आधीच उपस्थित आहेत, त्यामुळे आज चतुर्ग्रही योग, कलात्मक योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. तसेच आज सोमवती अमावस्या देखील आहे.

सोमवती अमावस्येच्या दिवशी कलात्मक योग, चतुर्ग्रही योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. मेष राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि तुमचं आजवर रखडलेलं कामही सहज पूर्ण होईल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे, व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि तुमच्या बँक बॅलन्समध्ये देखील चांगली वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखाचं असेल. तुम्ही तुमच्या जोडीदार आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. नोकरदारांना सहकारी आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमचं काम वेळेवर पूर्ण होईल. आज कुटुंबात सुख-शांती नांदेल.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, भौतिक सुख वाढेल. नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे आणि अधिकाऱ्यांशी तुमचे संबंधही सुधारतील. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, ते तुम्ही कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आज मिळवाल. इतरांच्या मदतीसाठीही तुम्ही पुढे सरसावाल. घरात शांततेचं वातावरण राहील. तुम्हाला एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल, जी ऐकून तुम्हाला बरं वाटेल. अविवाहित आज आवडत्या व्यक्तीसमोर भावना व्यक्त करू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृश्चिक राशीचे लोक आज तंदुरुस्त राहतील आणि त्यांना ताजंतवानं वाटेल, ज्यामुळे तुम्ही अपूर्ण कामं पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला अचानक वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक समस्याही दूर होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल, जी ऐकून तुमची मान अभिमानाने उंचावेल. व्यवसायिकांसाठी आज गुंतवणूक फायद्याची ठरेल. नोकरदारांना आज उत्तम यश मिळेल, वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. तुम्ही कुटुंबीयांसोबत मंदिरात वैगेरे जाऊ शकता.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी आज उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल खूप आनंदी असाल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल, ते मन लावून अभ्यास करतील. तुम्ही तुमचे खर्च नीट हाताळू शकाल, पैसे वाचवू शकाल. व्यापाऱ्यांना जास्त नफा कमावण्याची संधी मिळेल. नोकरदार लोक पगार वाढीसाठी दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. अविवाहित लोकांना चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण निर्माण होईल. 

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुम्ही इतरांवर सहज प्रभाव टाकू शकाल. तुमचं एखादं प्रदीर्घ प्रलंबित काम महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल. वैवाहिक जीवन सुखी राहील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी जीवन जगाल. तुम्ही मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदार लोकांच्या कामाचं आज कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. व्यावसायिकांना व्यवसाय क्षेत्रात भरपूर पैसे कमविण्याची संधी मिळेल. लवकरच तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Somvati Amavasya : सोमवती अमावस्येला बनले अनेक दुर्मिळ योग; ‘या’ 4 राशी होणार मालामाल, धनसंपत्तीत होणार वाढ

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *