‘आज तिला सगळ्यात जास्त मिस करतो’, उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी

'आज तिला सगळ्यात जास्त मिस करतो', उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी

[ad_1]

Umesh Kamat : मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, ओटीटी मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेश कामत (Umesh Kamat) हा लवकरच मायलेक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उमेशने अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही त्याची आणि प्रियाची (Priya Bapat) जोडीही प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडते. ते दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

उमेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही. पण नुकतच त्याने मायलेक या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या आईच्या आठवणी शेअर केला आहेत. उमेशचे आईवडिल आता या जगात नाहीत. पण या क्षेत्रात काम करण्यासाठी आईवडिलांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी यावेळी उमेशनं सांगितलं. आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या’मायलेक’ हा सिनेमा 19 एप्रिल रोजी सिनेमागृहात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता उमेश कामतनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

या क्षेत्रात येण्याचं खरं श्रेय आईचं – उमेश कामत

उमेशने नुकतच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आईच्या आठवणी शेअर केल्या आहेत. तुझं आणि तुझ्या आईचं नातं कसं होतं? यावर बोलताना उमेशनं म्हटलं की,  ‘मी या करिअरमध्ये येण्याचं सर्वात जास्त श्रेय हे आईचं आहे. माझा भाऊ चंद्रलेखेच्या नाटकात काम करायचा. मी तेव्हा भावाचं नाटक पाहायला जायचो. 250 प्रयोग झाल्यानंतर त्याची उंची वाढली आणि तेव्हा मोहन वाघ मला म्हणाले की तू करशील का तुझ्या भावाचं काम. तेव्हा मी हो म्हटलं आणि मी त्या नाटकात काम करायचो. पण आई बाबा दोघांनाही माझ्या प्रत्येक कामाचं कौतुक वाटायचं. माझं 10 नंतर एका व्यावसायिक नाटकासाठी सिलेक्शन झालं होतं, पण नंतर त्या नाटकातून मला काढून टाकण्यात आलं. मी तेव्हा 11 वी होतो, तेव्हाही माझी आई माझ्यासोबत आली होती.’ 

‘वादळवाट मालिका जेव्हा सुरु झाली, जेव्हापासून माझ्या मालिका यायाला लागल्या तेव्हा ती ज्या आनंदाने इतरांना माझ्याविषयी सांगायची ते मी फार मिस करतो. आईवडिलांनी कधीच कोणत्या बाबतीत अडवलं नाही. शिक्षणाच्याही नाही, त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. माझं आणि आईचं नातं फार मोकळेपणाचं होतं. आईचं जर काही चुकत असेल तर मी तिला सांगायचो. पण आज तिला खरंच खूप मिस करतो’, अशा आठवणी यावेळी उमेशने शेअर केल्या आहेत. 

ही बातमी वाचा : 

Mirzapur 3: ‘बीना भाभी’ने ‘बाबू जी’सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव; म्हणाली ‘दिग्दर्शकांनी मला…’

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *