आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांमध्ये स्पष्ट झाले; हे 2 संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहचणार!

[ad_1]

IPL 2024 Playoffs Scanrio: आतापर्यंत IPL 2024 चे एकूण 21 सामने झाले आहेत. सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) व्यतिरिक्त, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) गुणतालिकेत टॉप-4 मध्ये आहेत.  

गुणतालिकेतील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. ज्यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या संघांमध्ये क्वालिफायर खेळला जाईल. तर गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ एलिमिनेटरमध्ये आमनेसामने येतील. मात्र, जसजसे आयपीएलचे सामने होत आहेत, तसतसे प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स पुढे, पण…

आतापर्यंत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपले चारही सामने जिंकले आहेत, त्यामुळे हा संघ 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे सलग तीनही सामने जिंकले, त्यामुळे श्रेयस अय्यरच्या संघाचे 6 गुण झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, अद्याप निम्मे सामनेही झाले नसल्यामुळे सध्याच्या गुणतालिकेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, चौथ्या क्रमांकावरील चेन्नई सुपर किंग्ज आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचे प्रत्येकी 4 गुण आहेत. अशा स्थितीत केवळ एका सामन्यानंतर मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

…तर गुणतालिकेत होणार मोठा बदल

शेवटच्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि दुसऱ्या स्थानावर असलेला संघ कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फक्त 4 गुणांचे अंतर आहे, म्हणजे ऋषभ पंतच्या संघाने 2 सामने जिंकले आणि KKR संघाने 2 सामने गमावले तर गुणतालिकेत बदल शक्य आहे. . पण यावेळी पॉइंट टेबलवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट होते.

आज चेन्नई विरुद्ध केकेआर-

आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईमधील एमए चिदंबरम मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

संबंधित बातम्या-

आज चेन्नई अन् कोलकाताचा सामना; मात्र त्याआधी गौतम गंभीरच्या विधानाची रंगली चर्चा, धोनीबाबत काय म्हणाला?

4 पराभव पचवणाऱ्या दिल्लीसाठी खूशखबर, पंतच्या ताफ्यात नव्या भिडूची एन्ट्री 

हार्दिक पांड्यानं सोडला सुटकेचा निश्वास, वानखेडेवर नो हूटिंग, ओन्ली सपोर्ट

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *