‘इंडिया’आघाडीविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, निवडणूक आयोगाकडे जाण्याचा कोर्टाचा सल्ला

[ad_1]

नवी दिल्ली:  देशातील  विरोधकांच्या  26 पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ( NDA) आव्हान दिले आहे. त्यासाठी विरोधकांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. विरोधकांच्या या आघाडीच्या  INDIA  या नावाविरोधात  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी  करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.

याचिकाकर्त्यांच्यावतीने राजकीय नीतिमत्तेवर प्रश्न उपस्थित करताना न्यायालयाने सांगितले की,”आम्ही येथे राजकीय पक्षांच्या नीतिमत्तेवर सुनावणी करत नाही.” याचिकाकर्त्याने सांगितले की, . विरोधकांच्या या आघाडीच्या नावाविरोधात  एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे.

 विरोधकांनी इंडियाचे (I.N.D.I.A) तुकडे केले, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली. तर विरोधकांचं ‘इंडिया’ गठबंधन नाही, तर ते ‘घमंडिया’ गठबंधन असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.  विरोधकांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिल्यामुळे  कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत एक याचिका दाखल करण्यात आली होती. आज  सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनवाणी करण्यात नकार देत निवडणूक आयोगाकडे जाण्यचा सल्ला दिली आहे, 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *