[ad_1]
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election candidates) दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण 43 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसचे सरचिणीस केसी वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्याकडून काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीत अद्याप जागावाटपाची बोलणी सुरु असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत, असे के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या उमेदवारी यादीत आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाट येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.तर राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून राहुल कासवा आणि वैभव गेहलोत यांना जालोरे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारी यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यादीतील 76.07 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी उमेदवारांचा समावेश आहे. तर 76.07 टक्के उमेदवारांचे वय 60 पेक्षा कमी आहे. या तरुण उमेदवारांना जनता निवडून देईल, अशा विश्वास अजय माकन यांनी व्यक्त केला.
काँग्रेस उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे
मध्य प्रदेश
टिकमगड-पंकज अहिरवार
सीधी- कमलेश्वर पटेल
छिंदवाडा -नकुलनाथ
देवास- राजेंद्र मालवीय
खरगोन- पोरलाल खर्ते
भिंड- फूल सिंह बरैया
सतना – सिद्धार्थ कुशवाहा
झाबुआ- कांतिलाल भूरिया
मंडला- ओमकार मरकाम
राजस्थान
चुरू-राहुल कासवान
अलवर- ललित यादव
जालोरे- वैभव गेहलोत
अहमदाबाद पूर्व- रोहन गुप्ता
आणखी वाचा
LIVE: Congress party briefing by Shri @kcvenugopalmp in New Delhi. https://t.co/K3nuDYA7P9
— Congress (@INCIndia) March 12, 2024
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link