उद्धव ठाकरे आणि आमची आघाडी आता राहिली नाही, प्रकाश आंबेडकर ‘मविआ’बद्दल काय काय म्हणाले?

[ad_1]

Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे आणि आमची आघाडी आता राहिली नाही. आमची आधी आघाडी होती पण महाविकास आघाडीला त्यांनी प्राधान्य दिलं. आता महाविकास आघाडी सोबत जमले तर युती आहे नाही जमले तर युती नाही”,असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार अन्यथा आमची भूमिका जाहीर करणार

आम्हाला चार जागा कधीच ऑफर केल्या गेल्या नाहीत. महाविकास आघाडीने आम्हाला फक्त तीन जागा ऑफर केल्या.  त्यातील एक जागा अकोल्याची होती. आम्ही काय म्हणतोय कॅरी करण्यापेक्षा संजय राऊत काय म्हणतात हे जास्त कॅरी केले  जातय, त्यामुळे आमची भूमिका लोकांपर्यंत जात नाही. महाविकास आघाडीचा तिढा मिटणार नसेल तर आमची एन्ट्री होऊन काय उपयोग आहे. आज सकाळी आम्ही सांगितले आहे. 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार अन्यथा आमची भूमिका जाहीर करणार आहोत.  यामध्ये काँग्रेसला सात जागांना पाठिंबा देऊ. त्यांचा जमलं नाही तर आम्ही काँग्रेसला चॉईस दिली आहे. जर त्यांचा जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढवावी लागतील. त्यात काँग्रेस 48 जागा लढत असेल तर सात जागांना आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले,  कॅबिनेट निर्णयाला कुठल्या प्रकारे कोर्टात चॅलेंज होत नाही. कॅबिनेट निर्णय हा कलेक्टिव्ह निर्णय असतो. कॅबिनेट निर्णयाविरोधात या चौकशी एजन्सी  चौकशी करू शकतात का? हे स्पष्ट करा, अशी आमची सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे. आज केजरीवाल यांना अटक झाली.उद्याही वेळ कोणावर घेऊ शकते. केजरीवाल यांनी ठरवलं तर उद्या जेलमधून सरकार चालवेल. मात्र केजरीवाल यांनी दुसरा मुख्यमंत्री नेमावा कारण मॉरली बोंडिंग त्यांच्यावर आहे. 

आघाडी झाली नाही तरीही काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देणार 

आम्हाला कोणाला कळवण्याची गरज नाही. आम्ही पब्लिकला कळवू. आम्ही 26 तारखेला पुढचा निर्णय घेऊ त्यात आमची भूमिका स्पष्ट करू. यामध्ये काँग्रेसला सात जागांना पाठिंबा देऊ. त्यांचं जमलं नाही तर आम्ही काँग्रेसला चॉईस दिली आहे. जर त्यांचा जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढवाव्या लागतील. त्यात काँग्रेस 48 जागा लढत असेल तर सात जागांना आम्ही पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

इतर महत्वाच्या बातम्या 

आम्ही 26 तारखेला भूमिका स्पष्ट करू; प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *