एकमेकांचं तोंडही न बघणारे काँग्रेसचे तीन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, एकाच गाडीतून प्रवास, गडकरींना बालेकिल्ल्यात घेरणार?

[ad_1]

नागपूर : काँग्रेस नागपूर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना एक मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे तीन दिग्गज नेते आणि कधीकाळी पक्षांतर्गत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विलास मुत्तेमवार (Vilas Muttemwar) , सतीश चतुर्वेदी (Satish Chaturvedi) आणि नितीन राऊत (Nitin Raut) एकाच कारमधून जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसने या ठिकाणी तगडा उमेदवार देऊन भाजपच्या नितीन गडकरी यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. 

काँग्रेसची विदर्भात मोठी ताकद असतानाही त्या ठिकाणी अंतर्गत वादामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. नागपूरमधील काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंडही बघत नसल्याचं चित्र आहे. त्यामध्ये विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचं नाव घेतलं जातं. पण आज तिघेही एकत्रित दिसले आणि या तिघांनीही एकाच गाडीतून प्रवास केला.

विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे तिघेही बाहेरून नागपूर विमानतळावर दाखल झाले आणि एकाच कारमधून रवाना झाले. नागपूर लोकसभेच्या उमेदवारीवर या तिघांनीही कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र नागपुरात काँग्रेस मजबूत उमेदवार देईल, लवकरच काँग्रेसचा उमेदवार सर्वांच्या समोर असेल अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

 

Satish Chaturvedi, Vilas Muttemwar, Nitin Raut, Congress, BJP, Nagpur Lok sabha Election, Lok sabha Election,

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *