एकाधिकारशाही अडचण निर्माण करते, ‘माझा कट्टा’वर शाहू महाराजांचे कोल्हापूरकरांना आवाहन

[ad_1]

Shahu Maharaj on Majha Katta : “मी मतदारांना एवढचं आव्हान करतो की, खुल्या मनाने आणि डोळे उघडून योग्य पक्षाला मतदान करा. एकाधिकारशाही जगामध्ये कोठेही अडचणी निर्माण करते. तसा प्रश्न आपल्या भारतामध्ये येऊ नये. एकंदरीत सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने आपण आपलं कार्य सुरु ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे राज्य असे कधीही म्हटले गेले नाही. रयतेचे राज्य म्हटले गेले. नेहमी जनतेच्या सेवेत राहणे हे छत्रपती घराण्याचे काम आहे”, असं काँग्रेस पक्षाचे कोल्हापुरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. 

कोल्हापूरचा विचार केला तर कधीही दंगली होत नव्हत्या

शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरचा विचार केला तर कधीही दंगली होत नव्हत्या. आत्तासुद्धा ज्या दंगली घडल्या, त्याचा आपण रिपोर्ट घ्या. त्या कोणी घडवून आणल्या. बाहेरचे लोक आले होते, असा त्यावेळेसचा रिपोर्ट आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत आहेत

पुढे बोलताना शाहू महाराज म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत आहेत. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे. काही प्रश्न आपण प्राधान्याने हाताळले पाहिजेत. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यातून स्फुर्ती घेऊन काम केलं पाहिजे. 



इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : कंगना राणौत, अरुण गोविल यांना लोकसभेचं तिकीट, भाजपकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *