एप्रिलमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? RBI कडून यादी जाहीर, बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ‘हे’ काम करा

[ad_1]

Bank Holiday in April : बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मार्च (March) महिना संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. पुढच्या चार दिवसानंतर एप्रिल (April) महिना सुरु होणार आहे. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एप्रिलमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी असणार याबाबतची यादी जाहीर केलीय. एप्रिलमध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. अशा स्थितीत बँकेशी संबधीत कोणतीही कामं तुम्हाला करायची असतील तर त्यापूर्वी ही यादी पाहणं गरजेचं आहे. 

एप्रिल महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार

पुढच्या चार दिवसात 2023-24 हे आर्थिक वर्ष संपत आहे. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून बँकेनं ही सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केलीय. दरम्यान, एप्रिल महिन्यात अनेक सण येणार आहेत. या सणांच्या पार्श्वभूमावर बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे. या महिन्यात ईद, गुढीपाडवा, रामनवमी असे सण येणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यातच बँका तब्बल 14  दिवस बंद राहणार आहेत. या 14 दिवसांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या देखील आहेत. 

एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद?

1 एप्रिल 2024 – संपूर्ण देशभर बँका राहणार बंद
5 एप्रिल 2024 – तेलंगणा, जम्मू, श्रीनगर
7 एप्रिल 2024 – रविवारमुळं बँका राहणार बंद
9 एप्रिल 2024 – बेलापूर, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, श्रीनगर
10 एप्रिल 2024 – कोची आणि केरळ
11 एप्रिल 2024 –  गंगटोक, चंदीगढ आणि कोची वगळता सर्व देशात बँका बंद
13 एप्रिल 2024 – दुसरा शनिवार
14 एप्रिल 2024 – रविवार
15 एप्रिल 2024 – गुवाहाटी आणि शिमला
17 एप्रिल 2024 – बेलापूर, भोपाळ, अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगढ, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, कानपूर, जयपूर, रांची शिमला, लखनो, मुंबई आणि नागपूर
20 एप्रिल 2024 – आगरतळा
21 एप्रिल 2024 – रविवार
27 एप्रिल 2024 – चौथा शनिवार
28 एप्रिल 2024 – रविवार

RBI ने जाहीर केलेल्या यादीनुसार एप्रिलमध्ये वरीलप्रमाणे 14 दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही यादी एकदा तपासणे गरजेचे आहे, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सुट्टीच्या दिवशी जर बँकांच्या संदर्भातील काही महत्वाची कामं असतील तर ती कामं तुम्ही ऑलाईन पद्धतीं करु शकता.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! 31 मार्चला रविवार असूनही बँका राहणार सुरु, RBI च्या सुचना

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *