एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी! ‘हे’ चित्रपट अन् वेबसीरिज होणार रिलीज

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी! 'हे' चित्रपट अन् वेबसीरिज होणार रिलीज

[ad_1]

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात विविध चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. या आठवड्यातही ओटीटीवर कॉमेडी (Comedy), अॅक्शन (Action), रोमान्स (Romance) अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची आणि वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल (April) महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एकीकडे लोकसभा निवडणूक 2024 ची (LOksabha Election 2024) धामधूम आहे. शाळकरी मुलांच्या उन्हाळी उट्ट्या सुरू झाल्या आहेत. अशातच आता घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

फर्रे (Farrey)
कुठे पाहता येईल? झी 5
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

‘फर्रे’ हा चित्रपट एक अनाथ प्रतिभाशाली मुलगी नियतीवर आधारित आहे. एका श्रीमंत शाळेत तिला प्रवेश मिळतो. या शाळेतील श्रीमंत मुलांसमोर ती श्रीमंत असण्याचं नाटक करते आणि एका रॅकेटमध्ये अडकते. ‘फर्रे’ या चित्रपटात अलीजेह अग्निहोत्री आणि जीन शॉ प्रमुख भूमिकेत आहेत. तर प्रसन्ना बिष्ट, रोनित रॉय, साहित मेहता, जूही बब्बर, अरबाज खान आणि शिल्पा शुक्ला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 5 एप्रिलला हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ये मेरी फॅमिली सीझन 3 (Yeh Meri Family Season 3)
कुठे पाहता येणार? अॅमेझॉन मिनी टीव्ही
कधी रिलीज होणार? 4 एप्रिल 2024

‘ये मेरी फॅमिली सीझन 3’ या वेबसीरिजमध्ये 90 च्या दशकातील गोष्ट दाखवण्यात आली आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये विशेष बंसल, मोना सिंह, आकाश खुराना, अहान निरबान, रुही खान आणि प्रसाद रेड्डी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अॅमेझॉन मिनी टीव्हीवर चार एप्रिलला ही सीरिज रिलीज होणार आहे.

पॅरासाईट द ग्रे (Parasyte : The Grey)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

‘पॅरासाईट द ग्रे’ ही सीरिज ‘पॅरासाईट’ या कादंबरीवर आधारित आहे. मंगा हितोशी या पात्राभोवती फिरणारी या सीरिजची गोष्ट आहे. मंगा हितोशी या पात्राभोवती फिरणारी ही सीरिज आहे. येत्या 5 एप्रिलला नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होणार आहे. 

रिप्ले (Ripley)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 4 एप्रिल 2024

एका श्रीमंत माणसाची गोष्ट ‘रिप्ले’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘द  टैलेंटेड मिस्टर रिप्ले’वर आधारित ही सीरिज आहे. ‘रिप्ले’ ही सीरिज 4 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

स्कूप (Scoop)
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
कधी रिलीज होणार? 5 एप्रिल 2024

‘स्कूप’ या चित्रपटात गिलियन एंडरसन, रुफस सेवेल, बिली पाइपर आणि कीली हॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 5 एप्रिल 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

लूट सीझन 2 (Loot 2)
कुठे पाहता येईल? एप्पल टीव्ही प्लस
कधी रिलीज होणार? 3 एप्रिल 2024

‘लूट सीझन 2’ मध्ये मौली नौवाकला केंद्रीत करण्यात आले आहेत. मौलीचा लग्नाच्या 20 वर्षांनंतर घटस्फोट होतो त्यानंतर त्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा एक सामाजिक संस्था स्थापन करुन ती जगण्याचा संघर्ष करते. या सीरिजमध्ये माया रुडोल्फ, माइकेल जे रोड्रिग्ज, जोएल किम बूस्टर, रॉन फंचेस हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 3 एप्रिल 2024 रोजी एप्पल टीव्ही प्लसवर ही सीरिज रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Upcoming OTT Release of April : ‘या’ महिन्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेबसीरिज अन् चित्रपट

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *