एमएस धोनीचा ‘रॉकेट थ्रो’; अनुज रावतही पाहतच बसला, Video एकदा पाहाच!

[ad_1]

CSK Vs RCB: एमएस धोनीचा (MS Dhoni) आजही दबदबा कायम आहे. वयाच्या 42 व्या वर्षीही धोनीच्या फिटनेसशी कोणी बरोबरी करु शकत नाही हे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिसून आले. यष्टिरक्षक म्हणून धोनीने केवळ धावा वाचवल्या नाहीत तर दोन शानदार झेलही घेतले. तसेच डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने अनुज रावतला शानदार धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

एमएस धोनीने पाचव्या षटकात रजत पाटीदारचा आणि सहाव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलचा विकेटच्या मागे शानदार झेल घेतला. यानंतर त्याने आरसीबीच्या डावातील शेवटच्या षटकांत अनुज रावतला धावबाद केले. शेवटचा चेंडू जो पाचव्या स्टंपवर फुलर बॉल होता, दिनेश कार्तिकने तो कव्हरच्या दिशेने चालवण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि त्याला एक धावा घ्यायची होती. मात्र विकेटच्या मागे असलेल्या धोनीने चेंडू पकडून लगेच तो विकेटच्या दिशेने फेकला आणि अनुज रावतला बाहेरचा रस्ता दाखवला.

𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!

Just MSD things! 👏 👏

Watch It Here 🎥 🔽 #TATAIPL | #CSKvRCB | @msdhoni | @ChennaiIPL

— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024

ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान-

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. मात्र, धोनीचे नेतृत्व सामन्यादरम्यान सातत्याने पाहायला मिळाले, तेव्हा तो क्षेत्ररक्षणातही बदल करताना दिसला.

चेन्नईने आरसीबीचा केला पराभव-

आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकेकाळी 78 धावांच्या स्कोअरवर आरसीबी संघाने पाच विकेट गमावल्या होत्या, फाफ डू प्लेसिसने 23 चेंडूत 35 धावा केल्या होत्या आणि विराट कोहलीने 21 धावा केल्या होत्या, तर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांना खातेही उघडता आले नाही. कॅमेरून ग्रीनने 18 धावांचे योगदान दिले. पाच गडी बाद झाल्यानंतर, अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे संघ 173 धावांपर्यंत पोहोचू शकला. अनुज रावतने 25 चेंडूत 48 तर दिनेश कार्तिकने 26 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

CSK Vs RCB: ‘दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय’; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?

IPL 2024: 18 मार्चला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेला, 4 दिवसांनी परतला अन् चेन्नईला विजय मिळवून दिला

PBKS vs DC Score Live IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स आज पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; ऋषभ पंतकडे चाहत्यांचं लक्ष

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *