[ad_1]
8th Pay Commission: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. हा आयोग कधी गठीत होते आणि त्याच्या शिफारशी कधी लागू होतात, याची त्यांना उत्सुकता आहे. 7 वा वेतन आयोग (7th Pay Commission) 1 जानेवारी 2016 साली लागू झाला होता. या सातव्या वेतन आयोगाचा साधारण 1 कोटी कर्मचारी आणि पेन्सनधारकांना फायदा झाला होता. प्रत्येक दहा वर्षांनी नव्या आयोगाची स्थापना केली जाते. त्यानंतर या आगोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार वाढवला जातो. त्यामुळेच आता सर्वांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची कधी स्थापना होणार, असे विचारले जात आहे. आगामी 1 जानेवारी 2026 सालापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे. हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात तसेच पेन्शनमध्ये वाढ होईल.
31 डिसेंबर 2025 सातव्या वेतन आयोगाची मुदत संपणार
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे. तसं पाहायचं झालं तर 31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाची मुदत संपायला हवी. मात्र याबाबत अद्याप तशी कोणतीच स्पष्टता नाही. सरकारने आठव्या वेतन आयोगाबबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात आठवा वेतन लागू होणार की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या एका वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे अनेकवेळा केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर आठव्या वेनत आयोगाबाबत वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांना विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आमच्याकडे बराच वेळ आहे, असे सोमनाथन यांनी सांगितले होते.
किमान पगार 18 हजार रुपये, पेन्शन 9 हजार रुपये
सहाव्या वेतन आयोगानंतर (6th Pay Commission) 7 वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली होती. तेव्हा सरकारने फिटमेंट फॅक्टर 3.68 ठेवावा अशी मागणी केली होती. पण सरकारने फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता. त्यानंतर फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 7000 रुपयांवरून 18 हजार रुपये झाला होता. यासोबतच पेन्शनही 3500 रुपयांनी वाढून 9000 रुपये झालं होतं. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन 2.50 लाख रुपये तर कमाल पेन्शन 1.25 लाख रुपये झाले होते.
आता किमान पगार 34,560 रुपये तर पेन्शन 17,280 रुपये होणार?
आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी संघटनांची मागमी मान्य केल्यास फिटमेंट फॅक्टर 1.92 केलं जाऊ शकतं. असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून थेट 34,560 रुपये होईल. तसेच किमान पेन्शन 17,280 रुपयांपर्यंत पोहचू शकते.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशबखर मिळणार? आठवा वेतन आयोग कधी लागू होणार; नेमका पगार किती वाढणार?
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग नेमण्यासंबंधी कोणताही विचार नाही, केंद्र सरकारची लोकसभेत माहिती
8th Pay Commission : आठवा वेतन आयोग येणार की नाही? मोदी सरकारने स्पष्ट सांगितलं
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link