काश्मीरमध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; 40 जवानांना वीरमरण

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अतिरेक्यांनी 200 किलो स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन होत्या. या तीन बटालियनमध्ये जवळपास 2500 हजार सैन्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *