छोटा पॅकेट बडा धमाका! या कंपनीत 8 महिन्यांपूर्वी पैसे गुंतवणारे आज कोट्यधीश

[ad_1]

मुंबई : मागील आर्थिक वर्षी आयपीओच्या दृष्टीने चांगलेच सकारात्मक राहिले.  या काळात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (IPO) माध्यमातून कंपन्यांनी तसेच गुंतवणूकदारांनीही बऱ्यापैकी पैसे कमवले. काही कंपन्यांचे आयपीओ तर असे आहेत, जे गुंतवणूकदारांना समाधानकारक रिटर्न्स देणार का? असे विचारले जात होते. मात्र या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारकपणे रिटर्न्स दिले आहेत. यामध्ये बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड (Bondada Engineering Ltd.) या कंपनीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. या कंपनीने आयपीओ आल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1400 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 

तब्बल 1400 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यापासून त्याने चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीला शेअर बाजारावर सूचिबद्ध होऊन एक वर्ष पूर्ण झालेले नाही. पण या कंपनीत आयपीओच्या माध्यमातून गुंतवणू करणाऱ्यांनी मात्र चांगला पैसा कमवला आहे. आयपीओपासून फक्त आठ महिन्यांत या शेअरने तब्बल 1400 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.   

चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) या कंपनीचे शेअर्स चांगलेच वर जात होते. सुरुवातीच्या सत्रात या कंपनीचा शेअर 1,190 रुपयांपर्यंत गेला होता. मात्र त्याचे मूल्य 1161 रुपये आहे. या शेअरचे  52 आठवड्यांतील ऑल टाईम हाय मूल्य हे 1,191.75 रुपये आहे. 

मल्टिबॅगर ठरला शेअर 

गेल्या पाच दिवसांपासून बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअरचा आलेख चढा आहे. या पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. म्हणजेच तीन महिन्यांत हा शेअर मल्टिबॅगर ठरलाय. 

50 कोटींचा होता आयपीओ 

या कंपनीने गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात आपला आयपीओ आणला होता. हा आयपीओ 42.72 कोटी रुपयांचा होता. सुरुवातीला या कंपनीने आपल्या एका शेअरची किंमत 75 रुपये ठेवली होती. आज याच शेअरची किंमत 1,191 रुपयांपर्यंत गेली आहे. तुलनाच करायची झाल्यास आयपीओ आल्यापासून या कंपनीच्या शेअर्सने 1,486 टक्के रिटर्न्स दिले आहेत. 18 ऑगस्ट 2023 रोजी हा आयपीओल लॉन्च झाला होता.  

गुतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स 

बोंदाडा इंजिनिअरिंगच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 1600 शेअर होते. म्हणजेच या कंपनीनच्या आयपीओत गुंतवणऊक करायची असल्यास गुंतवणूकदारांकडे कमीत कमी 1 लाख 20 हजार रुपये असणं गरजेचं होतं. आताच्या बाजारमूल्यानुसार गणित करायचं झाल्यास याच एका लॉटचे मूल्य आता 19 लाख 4 हजार रुपये झाले आहे. म्हणजेच आठ महिन्यांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने बोंदाडा इंजिनिअरिंगच्या आयपीओमध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या शेअर्सचे मूल्य हो कोट्यवधी रुपये असते. आज तोच गुंतवणूकदार थेट कोट्यशीश झाला असता. 

(टीप- या लेखाचा फक्त माहिती देण्याचा उद्देश आहे. हा लेख म्हणजे गुंतवणुकीचा सल्ला समजू नये. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

हे ही वाचा :

रतन टाटांनी लग्न केलं नाही, पण मागे मोठा परिवार; कोट्यवधींचं साम्राज्य सांभाळणाऱ्या ‘या’ सदस्यांविषयी जाणून घ्या!

आधी 12 आता थेट 214 रुपये! ‘या’ कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!

चार वर्षांत एका लाखाचे झालेत तब्बल 45 लाख, छप्परफाड रिटर्न्स देणाऱ्या ‘या’ कंपनीविषयी माहिती आहे का?

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *