[ad_1]
Maharashtra Politics : मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण (Ashok Chavan) जबाबदार असल्याचा दावा काँग्रेसचे (Congress) काही नेते खासगीत बोलताना करतायेत. जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेमध्ये चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेमध्ये काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे ठाकरे गट (Thackeray Group) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar Group) राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघावर दावा केला. सांगली (Sangli), भिवंडी (Bhiwandi) आणि दक्षिण मध्य मुंबई (South Central Mumbai) ही याची काही उदाहरणं. त्यामुळे पक्षांतर करण्यापूर्वी अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक हा घोळ करून ठेवला का, असा संशय आता काँग्रेसचे काही नेते व्यक्त करतायेत.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link