[ad_1]
मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकीकडे अलिकडच्या काळात खूप वाढ झाली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक काहीशी जोखीमीची असली, तरी त्यातील नफा पाहता अनेक जण स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक (Investment) करतात. यामध्ये अनेकांना भरघोस नफा कामवण्याची संधीही मिळते. तुम्हीही स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असाल तरी ही तुमच्या कामाची बातमी आहे. आता तुम्हाला स्टॉक्स विकल्यानंतर त्याच दिवशी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीने आता शेअर मार्केटमध्ये T+0 सेटलमेंट सुरु केली आहे.
सेबीकडून नवीन सेटलमेंट लागू
भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India) म्हणजेच सेबी (SEBI) कडून नवी सेटलमेंट लागू करण्यात आली आहे. सेबीकडून ऑप्शनल बेसिस पर T+0 सेटलमेंट सुरु करण्यात आली आहे. 28 मार्चपासून ही नवी सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे. सेबीने 25 स्टॉक्सवर T+0 सेटलमेंट लागू केली आहे. यामुळे हे स्टॉक विकल्यास तुमच्या खात्यात त्याच दिवशी पैसे जमा होतील.
ज्यादिवशी शेअर विकणार त्याचदिवशी पैसा खात्यात येणार
शेअर बाजारात आतापर्यंत T+1 सेटलमेंट लागू होती. यामध्ये गुंतवणूकदाराने स्टॉक्स विकल्यावर त्याच्या एका दिवसानंतर त्याला त्या स्टॉकचे पैसे मिळायचे. तीन महिन्यांपूर्वी शेअर बाजार नियामक मंडळाने T+0 सेटलमेंट संदर्भात मत आणि सल्ले मागवले होते. त्यावर 12 जानेवारीपर्यंत लोकांची मते मागवण्यात आली होती. सहा दिवस आधी शेअर बाजार नियामकाने 6-चरण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
T+0 सेटलमेंट सिस्टम आहे तरी काय?
सेबीकडून T+0 सेटलमेंट सध्या चाचणीसाठी काही स्टॉक्सवर लागू करण्यात आली आहे. NSE आणि BSE मधील काही शेअर्सवर T+0 सेटलमेंट लागू करण्यात आली आहे. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) 25 स्टॉक्सची यादी जाहीर केली आहे, ज्यावर T+0 सेटलमेंट लागू असेल. यामुळे ज्या दिवशी तुम्ही हे शेअर विकाल त्याच दिवशा तुम्हाला तुमचे पैसे मिळतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link