तर ४८ जागांवर उमेदवार देणार – प्रकाश आंबेडकर


श्रीरामपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा. काँग्रेस पक्षाने आराखडा दिला नाही तर आम्ही सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपुर येथे पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेस पक्षाने द्यावा. त्यानंतरच नंतरच आम्ही १२ जागांवर चर्चा करू. त्या जागा कोणत्या सोडायच्या ते सर्व आम्ही काँग्रेसवर सोडले आहे. आराखडा न दिल्यास आम्ही महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार आहोत. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. मनुवादी संविधान आणायचे आहे. दोन समांतर प्रशासन देशात कार्यरत आहेत. मिडियाच्या माध्यमातून काँग्रेस केवळ जागा वाटपावर बोलत आहे, मात्र आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याचा कार्यक्रम काँग्रेस द्यायला तयार नाही. राज्यातील काँग्रेस व आपण आरएसएसला सविंधनाच्या चौकटीत बसवण्याचा आराखडा तयार करू अशी आमची सूचना आहे, मात्र काँग्रेस ते करायला तयार नाही. ते वरिष्ठांकडे बोट दाखवून चालढकल करत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *