तीन दिवसांनी होणार शनीचा उदय; कुंभसह ‘या’ 4 राशी होणार मालामाल, आर्थिक स्थिती सुधारणार

[ad_1]

Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये शनीला (Shani) विशेष स्थान आहे. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. असं म्हणतात की, शनिदेवाची ज्या व्यक्तीवर शुभ दृष्टी पडते त्याला जीवनात कसलीही कमतरता भासत नाही. कुंडलीत शनिदेवाची शुभ स्थिती असल्यास व्यक्ती आयुष्यात हवं ते मिळवू शकतो. शनीच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो.

2024 या वर्षात शनि कुंभ राशीत राहूनच आपल्या हालचाली बदलणार आहे, सध्या तो अस्त स्थितीत आहे. 18 मार्चला शनीचा कुंभ राशीत उदय (Shani Uday 2024) होईल. जून 2024 पर्यंत शनि (Shani) उदय स्थितीत राहील. ज्योतिषशास्त्रात शनीचा उदय ही शुभ घटना मानली जाते. शनीच्या उदयाने काही राशींचा कठीण काळ संपेल आणि त्यांना चांगले दिवस येतील. शनिदेवाचा उदय झाल्यावर 4 राशींच्या लोकांना मोठा फायदा होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय विशेष फलदायी ठरेल. मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होईल. प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही प्रगती कराल. स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी  शनीचा उदय फार शुभ ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नातही वाढ झालेली दिसेल. मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात दोन्हीकडे चांगले परिणाम पाहायला मिळतील. शनि उदय काळात तुमच्या पगारात वाढ होण्याची चिन्हं आहेत, तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक पटीने पगारवाढ मिळेल. तुम्हाला पैसे कमावण्याच्या काही वेगळ्या संधीही मिळतील. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

कन्या रास (Virgo)

शनीच्या उदयानंतर कन्या राशीचं नशीब चमकेल. कन्या राशीच्या लोकांना या काळात शुभ परिणाम मिळतील. तुमच्या करिअरसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठं यश मिळेल. कन्या राशींच्या व्यक्तींवर शनीची विशेष कृपा राहणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कन्या राशीच्या लोकांना आजवर त्यांच्या मेहनतीचं अपेक्षित फळ मिळत नव्हतं, पण आता शनि त्यांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ देईल. या काळात तुमच्या नोकरीत तुमच्या कामाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra)

शनीचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. शनि तुमच्या कुंडलीत भाग्याच्या स्थानी आहे, यामुळे शनि तुम्हाला भरघोस आर्थिक लाभ देईल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये समाधानी आणि आनंदी दिसाल. शनीची स्थिती तूळ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी देईल.या काळात वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. या राशीचे लोक आध्यात्मिक मार्गावर पुढे जातील. कोणत्याही अडचणीशिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तु्म्ही यश मिळवू शकाल. शनि तुम्हाला मेहनतीचं योग्य फळ देईल.

कुंभ रास (Aquarius)

शनीच्या उदयामुळे कुंभ राशीच्या लोकांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात नोकरीला धरुन तुम्ही आणखी काही नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळेल. या राशीच्या लोकांना एखाद्या ठिकाणाहून चांगल्या नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या उदयामुळे खूप सकारात्मक परिणाम मिळतील. शनिदेवाची ही स्थिती तुमच्या करिअरसाठी अनुकूल असेल. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाचीही भरभराट होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : तब्बल 12 वर्षांनंतर मेष राशीत बुध-गुरुची युती; ‘या’ 3 राशींचं नशीब पालटणार, प्रगतीसह धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *