[ad_1]
Congress on PM Modi : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण केल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर आज पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यात माफी मागितली. या घटनेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमच्यासाठी एक नाव नाही तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. दरम्यान, मोदींनी माफी मागण्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे.
राजेंचा हा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफ करणार नाही
काँग्रेसने ट्विट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी आज नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्यास भाग पाडले. पण ही माफी नाही तर निमित्त आहे. आपल्या अक्षम्य पापाबद्दल मोदी खरोखरच माफी मागत असतील तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून दूर करावे. तसेच या प्रकल्पात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करा. राजेंचा हा अपमान महाराष्ट्र विसरणार नाही आणि माफ करणार नाही.
महाराष्ट्र की जनता और विपक्ष के घोर विरोध ने आज नरेंद्र मोदी को छत्रपति शिवाजी महाराज से माफी मांगने पर मजबूर कर दिया।
लेकिन ये माफी नहीं ढोंग है।
अगर मोदी वाकई में अपने इस अक्ष्म्य पाप के लिए माफी मांग रहे हैं, तो वे महाराष्ट्र के CM और डिप्टी CM को अपने पद से हटाएं।
साथ ही…
— Congress (@INCIndia) August 30, 2024
सावरकरांना शिव्या देणाऱ्यांसारखे आम्ही नाही
दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, आज मी माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो. आमची मूल्ये वेगळी आहेत, आम्ही ते लोक नाही जे या भूमीचे सुपुत्र, भारतमातेचे महान सुपुत्र वीर सावरकर यांचा अपमान करत राहतात. ते माफी मागायला तयार नाहीत, ते न्यायालयात जाऊन लढायला तयार आहेत.
महाराष्ट्राच्या भूमीवर येताक्षणीच मी आज सर्वप्रथम माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक झुकवून क्षमा मागितली. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मी त्यांची देखील क्षमा मागतो जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतात. pic.twitter.com/mlhBdZDoPs
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत
पीएम मोदी पुढे म्हणाले की,आज या कार्यक्रमाबद्दल बोलण्यापूर्वी मला माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर सर्वप्रथम मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले ते माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. आज मी माझ्या प्रिय देवाच्या चरणी मस्तक टेकून माफी मागतो.
पंतप्रधान मोदी यांनी आज पालघरमध्ये अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात विकासाची क्षमता आणि आवश्यक संसाधने आहेत. येथे समुद्र किनारे देखील आहेत आणि या किनाऱ्यांवरून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा शतकानुशतके जुना इतिहास आहे. येथे भविष्यासाठीही अपार शक्यता आहेत. या संधींचा महाराष्ट्र आणि देशाला पुरेपूर लाभ मिळावा यासाठी आज वाधवान बंदराची पायाभरणी करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल. हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात खोल बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर असेल.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]
Source link