तू अजूनही सिंगल आहे? टायगरच्या उत्तरामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला माझी ‘दिशा’…

[ad_1]

Tiger Shroff : टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या ‘बडे मियां छोटे मिया’ (Bade Miya Chote Miya) या चित्रपटाच्या रिलीजमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट 10 एप्रिल ऐवजी 11 एप्रिलला म्हणजेच ईदच्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे. पण त्याच्या एका वक्तव्यामुळे त्याचं आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत पॅचअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

काही दिवसांपूर्वी दिशा आणि टायगर या दोघांनी अक्षय कुमारच्या घरी होळी पार्टीला हजेरी देखील लावली होती. त्यामुळे या दोघांचं पॅचअप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टायगरच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय. पण खरचं या दोघांचं पॅचअप झालंय की, पुन्हा या फक्त चर्चा आहेत, हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच. 

माझी एकच दिशा आहे – टायगर श्रॉफ

नुकतच टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी टायगर श्रॉफला विचारण्यात आलं की, तु अजूनही सिंगल आहेस का? तुझ्या आयुष्यं कोणत्या दिशेने सुरु आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना टायगरने म्हटलं की, सध्या माझ्या आयुष्यात एकच दिशा आहे आणि ते म्हणजे माझं काम. पुढे बोलताना त्यानं म्हटलं की, तुम्हाला मी त्याच गोष्टींवर विचार करण्यास भाग तर नाही ना पाडलं. अशी मिश्किल टीप्पणी देखील त्याने यावेळी केली. 

2016 पासून डेटिंगच्या चर्चा, 2023 मध्ये झालं टायगर दिशाचं ब्रेकअप 

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांच्या अफेअरच्या चर्चा 2016 पासून सुरु होत्या. परंतु दोघांनी उघडपणाने कधीही याविषयी भाष्य केलं नाहीये. दिशाचं टायगरच्या घरच्यांशीही चांगलं नातं निर्माण झालं होतं. पण 2023 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर दोघे एकत्र दिसणंही बंद झालं. पण आता नुकतच ते दोघे होळीच्या निमित्ताने एकत्र दिसले होते. पण आता टायगरच्या या उत्तराने पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. 


ही बातमी वाचा : 

Shah Rukh Khan : शाहरुखची होणारी सून आता ऐकत नसते; आर्यन खानला रुमर्ड गर्लफ्रेंडने सर्वांसमोर दिली फ्लाइंग किस; पाहा VIDEO

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *