तो क्षण लवकरच येणार! नेत्रा करणार अस्तिकाचा शेवट, मालिकेला रंजक वळण

तो क्षण लवकरच येणार! नेत्रा करणार अस्तिकाचा शेवट, मालिकेला रंजक वळण

[ad_1]

Satvya Mulichi Satavi Mulgi : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. तसेच लवकरच या मालिकेत मोठी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. कारण लवकरच त्रिनयना देवी अस्तिकाचा शेवट करणार आहे. अस्तिका विरोचकाने दिलेला काळा मणी तिच्याकडे असल्यामुळे सुरक्षित रहात होती. पण ही गोष्ट नेत्राला कळते आणि ती हीच गोष्ट अद्वैतला सांगते. त्याचवेळी रुपालीसुद्धा अस्तिकाला सांगते की अव्दैत-नेत्रा दोघे मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील. 

सध्या मालिकेत अस्तिका ही नेत्रा म्हणून वावरत आहे. त्याचप्रमाणे ती नेत्राला त्रिनयना देवीच्या मूर्तीच्या जागी विरोचकाची मूर्ती आणण्याचं देखील आव्हान देते. पण नेत्रा मात्र अस्तिकाला जशासं तसं उत्तर देते. त्याचसाठी नेत्रा आणि अद्वैत मिळून अस्तिकाचा वध करण्याची योजना आखत असतात. घरातले सगळेजणही त्यांना साथ देतात. पण रुपाली अस्तिकाला सांगते की, ते तुला संपण्याआधीच तू अद्वैतचा जीव घे आणि नागरुपात येऊन खोलीत लपून रहा. 

नेत्रा करणार अस्तिकाचा वध

दरम्यान रुपालीच्या सांगण्यामुळे अस्तिका पूर्णपणे गोंधळून जाते. काय करावं हेच तिला कळत नाही. त्यानंतर ती अद्वैतच्या प्रेमळ बोलण्यात अडकते. तरीही रूपाली अस्तिकाला अव्दैतच्या जाळ्यातून सोडवते आणि तिला सांगते, की अव्दैतला पुन्हा मारण्याचा प्रयत्न कर.नेत्रा विरोचकाची खेळी पूर्णपणे ओळखते आणि घरातल्या सर्वांना एकत्र रहा असं सांगते.  त्यानंतर नेत्रा अस्तिकाचा वध करण्यासाठी काय मार्ग असू शकेल, यावर विचार करते.राजाध्यक्ष कुटुंब नेत्राला अस्तिकाचा वध करताना कशी मदत करणार, नेत्रा अव्दैतचा जीव वाचवून मग अस्तिकाचा वध कसा करणार, हे प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका  कधी संपणार? 

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलींमध्ये युद्ध होईल. या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचा शेवट होईल असेही त्यांनी सांगितले. विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही, त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला. 

ही बातमी वाचा : 

Prashant Damle Birthday : 40 वर्षांच्या कारकिर्दीत कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी का नाही? प्रशांत दामलेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले ‘त्यासाठी वेळ द्यावा…’

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *