दुर्धर आजरावर मात करुन एक नटसम्राट रंगमंचावर परतणार, ‘झी नाट्य गौरव’च्या व्यासपीठावर अतुल परचुरेंचा विशेष सन्मान

दुर्धर आजरावर मात करुन एक नटसम्राट रंगमंचावर परतणार, 'झी नाट्य गौरव'च्या व्यासपीठावर अतुल परचुरेंचा विशेष सन्मान

[ad_1]

Zee Natya Gaurav Puraskar 2024 : अवघी नाट्यसृष्टी ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहते तो झी नाट्य गौरवचा पुरस्कार सोहळा (Zee Natya Gaurav Puraskar 2024) काही दिवसांपूर्वी पार पडला. उद्या म्हणजेच 7 एप्रिल रोजी या सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात संजय मोने (Sanjay Mone), वंदना गुप्ते (Vandana Gupte), प्रशांत दामले (Prashant Damle), चंद्रकांत कुलकर्णी (Chandrakant Kulkarni), महेश मांजरेकर (Mahesh Majarekar), अतुल परचुरे (Atul Parchure), सुनील बर्वे (Sunil Barve) या दिग्गज कलाकारांसह प्रिया बापट (Priya Bapat), उमेश कामत (Umesh Kamat), सिद्धार्थ जाधव, संकर्षण कऱ्हाडे या कलाकार मंडळींनी हजेरी लावली. तसेच त्यांनी मंचावर सादरीकरण देखील केलं. यामध्ये विशेष लक्ष वेधलं ते अतुल परचुरे यांच्या परफॉर्मन्सने. 

काही महिन्यांपूर्वी अतुल परचुरे यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली. त्यानंतर त्यांनी रंगमंचावर पुनरागमन केलं. त्यांच्या रंगभूमीवरच्या कार्याचा यंदाच्या झी नाट्य गौरवमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर आनंद इंगळे, सुनील बर्वे, महेश मांजरेकर, संजय मोने, पुष्कर श्रोत्री, मोहन जोशी हे कलाकार उपस्थित होते. या सगळ्यांच्या हस्ते अतुल परचुरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सगळ्यांनी अतुल परचुरे यांच्यासाठी एक गाणं देखील सादर केलं. 

पार पडणार ‘झी नाट्य गौरव’ सोहळा

झी चित्र गौरव सोहळा पार पडल्यानंतर आता झी नाट्य गौरवची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. झी नाट्य गौरव हा पुरस्कार सोहळा उद्या म्हणजेच रविवार 7 एप्रिल रोजी प्रक्षेपित केला जाणार आहे. या सोहळ्याला अनेक कलाकारांच्या नाटकाचा छोटा भाग सादर केला जाईल. त्याचप्रमाणे या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या सोहळ्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा : 

UBT Star Campaigners List : किरण माने, बांदेकर भोवजी ठाकरेंची मशाल घराघरात पोहचवणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक प्रचार करणार

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *