धक्कादायक! चोरट्यांनी मुख्य महामार्गावरील एटीएम गॅस कटरने फोडलं; वीस लाखांची रोकड लंपास

[ad_1]

Buldhana News बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम (ATM) गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमध्ये (Robbery) आज्ञातांनी एटीएममधून 20 लाखांची रोकड लंपास केली आहे. ही खळबळजनक घटना आज रविवार 10 मार्चच्या (Buldhana News) पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व चोरीचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून कारमधून आलेल्या चार ते पाच अज्ञातांनी हे एटीएम फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गॅस कटरने फोडलं मुख्य महामार्गावरील एटीएम 

विशेष बाब म्हणजे, या चोरीच्या घटनेतील आज्ञात आरोपी एका आलिशान कार मधून आले असून पहाटेच्या सुमारास अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने गावातील नागरिक जागी झाले आणि त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून पळ ठोकला. या घटनेचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे. 

20 लाखांची रोकड केली लंपास

बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश एमटीएमच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, चोरटे अनेक उपाययोजना करून त्यांनाही निकामी करतात. त्यामुळे बरेचदा या आरोपींची शोध घेण्यास विलंब होत असतो. अशातच आज पहाटेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या या एटीएम वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत त्यातील 20 लाखांची रोकड लंपास केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील मुख्य रस्त्यावर हे एटीएम असून देखील मोठ्या शिताफीने त्यांनी हे एटीएम (ATM) गॅस कटरच्या साहाय्याने फोडले आहे. ही चोरी करण्यापूर्वी त्यांनी या परिसराची पाहणी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेतील आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. 

बुलढाणा जिल्ह्याची उंचावली मान; 5 विद्यार्थ्यांची इंग्लंड मध्ये शिक्षणासाठी निवड

बुलढाणा जिल्ह्यातील एकाच शाळेतील 5 विद्यार्थ्यांचा इंग्लंड मधील जागतिक दर्जाच्या विद्यापीठांत पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. नुकतीच 12 वीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक नावाजलेल्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याने विद्यार्थ्यांचे जिल्हा भरात मोठे कौतुक होत आहे. यामुळे जिल्ह्याची मान उंचावली गेलीय. खामगाव शहरातील क्रिएटर ज्युनिअर कॉलेजच्या या पाचही विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणाची संधी मिळाल्याने त्याचा फायदा देशाच्या विकासासाठी करणार असल्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. तर शाळेच्या वतीने सुद्धा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून शाळेसाठी ही गौरवाची बाब असल्याचे शाळेकडून सांगण्यात आलय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *