धुलिवंदनच्या दिवशी अहमदनगर हादरलं! दारूच्या नशेत पतीने पत्नीसह दोन मुलींना कोंडून पेटवले घर, तिघींचा मृत्यू

[ad_1]

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दारुच्या नशेत पतीने हे कृत्य केले आहे. या कृत्यामुळे नगरसह (Ahmednagar Crime News) परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

सुनील लांडगे (Sunil Landge) असे आरोपी पतीचे नाव असून त्याने आपली पत्नी लीला आणि दोन मुलींना घरात कोंडले. त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकत आग (Fire) लावून पत्नी आणि दोन मुलींना जाळून मारले आहे. हा सर्व प्रकार सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नी आणि दोन मुलींचा होरपळून मृत्यू 

आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनील याच्या घराकडे धाव घेतली. मात्र घराला कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांना काही मदत करता आली नाही आणि घरामध्ये कोंडून टाकलेल्या पत्नी आणि मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

पतीने दिली गुन्ह्याची कबुली 

दरम्यान, नगर तालुका पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने केलेल्या कृत्याची लगेचच पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

‘ती’चा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, थांबवण्यासाठी लेकरांची आईकडे धाव, पण काळाला वेगळंच काही मान्य, चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं, चार चिमुकल्यांनी जीव गमावला

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *