नारळी पौर्णिमेच्या आपल्या मित्र परिवाराला द्या ‘या’ खास शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा

[ad_1]

Narli Paurnima 2024 : वर्षभर कोळीबांधव ज्या सणाची आतुरतेने वाट पाहतात असा नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima) सण आज सर्वत्र साजरा केला जातोय. या दिवशी कोळीबांधव दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.

या निमित्ताने काही हटके शुभेच्छा संदेशांनी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्र-परिवाराला शुभेच्छा देऊ शकता. आणि सणाचा आनंद द्विगुणित करु शकता. 

1. “नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी कोळी बांधव प्रार्थना करती..
घराघरांत आज नैवेद्याला नारळी भात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

2. “नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हाला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!”

 

3. नारळी पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी वरुण राजा तुमचे जीवन खूप आनंद, समृद्धी आणि यशाने भरुन जावो, 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

4. देव वरुण तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करो आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो,
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

5. “दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”

6. दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

7. कोळी बांधवांचा सण उधाण आनंदाला 
कार्यारंभ करती वाहूनी श्रीफळ सागराला 
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

8. कोळीवारा सारा सजलाय गो…!
कोळी यो नाखवा आयलाय गो…!
‘मासळीचा दुष्काळ सरु दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे’
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

9. कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

10. सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Narali Purnima 2024 : सण आयलाय गो…नारळी पुनवेचा; कोळीबांधवांच्या या सणाचं महत्त्व नेमकं काय? जाणून घ्या पौराणिक कथा

                                        

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *