निक्कीला थंडी वाजताच अभिजीतनं दिलं जॅकेट, दोघांची मैत्री पाहून डीपी-अंकीताला हसू अनावर

Abhijeet Sawant give jacket to Nikki Tamboli Bigg Boss taken spin of Dhananjay Powar Ankita Walawalkar Bigg Boss Marathi News Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी वाजली, अभिजीतनं जॅकेट दिलं, डीपी, अंकीताला हसू आलं; त्यानंतर बिग बॉसनं जे केलं...

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 34 : सध्या बिग बॉसच्या घरातील टीम बदलल्याचं दिसत आहे. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला निक्कीने टीम एमधून काढता पाय घेतला. यानंतर निक्कीने अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या मैत्रीत दुरावा आला. यानंतर घरातील इतर सदस्य अरबाजला निक्कीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले. 

निक्कीला थंडी वाजताच अभिजीतनं दिलं जॅकेट

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य ‘बिग बॉस’ काय आदेश देणार, हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान, निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येतं. त्यावर बिग बॉस म्हणतात, “धनंजय, अंकिता फार हसू येतंय… मलाही सांगा हा जोक”. त्यावर डीपी दादा म्हणतो, “बिग बॉस काही जोक नव्हता”. पुढे बिग बॉस म्हणतात, “मी सांगू का आपल्या मनात काय होतं…जाऊदे..”. 

बिग बॉसने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदलल्याचं पाहायला मिळालं. टीम एमधील सदस्यांमध्ये ताटातूट झाली आहे. यासोबत इतर राडेही सुरुच आहेत. अशात आजच्या भागात डीपी दादा आणि अंकिताची बिग बॉस फिरकी घेताना दिसणार आहेत. 

 

निक्की करतेय अंकिताची नक्कल

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की अंकिताची नक्कल करताना दिसणार आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय, “काल अंकिता घाबरली होती. डीपीला सांगत होती नॉमिनेटेड आहे. मला तर म्हणत होती, “तुझ्या नॉमिनेशनची मला भीती वाटत नाही. नॉमिनेट झाल्यानंतर मी तिचं वेगळं रूप पाहिलं. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत असल्याने अंकिता घाबरली आहे”. पुढे अंकिता येते आणि म्हणते, “मला बोलतेय…डायरेक्ट बोल की”. तर निक्की, अभिजीत, वैभव, अरबाज यांच्यात जेवणावरुन भांडण झालेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *