नीना कुळकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, स्टार प्रवाहवर सुरु होणार ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘ही’ नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

Star Pravah Serial Update : स्टार प्रवाहकडून (Star Pravah) पुन्हा एकदा पुढचं पाऊल टाकत तिसऱ्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) ही नवी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी (neena kulkarni) या छोट्या पडद्यावरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचप्रमाणे पूजा बिरारी (Pooja Birari) आणि विशाल निकम (Vishal Nikam) ही नवी कोरी जोडी या मालिकेत झळकणार आहेत. अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसतील. 

स्टार प्रवाह वाहिनीवर उद्यापासून म्हणजेच 17 मार्च पासून घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. त्यातच आता स्टार प्रवाहकडून तिसरी मालिका तयार करण्यात आली आहे. सध्या अनेक वाहिन्यांवर नव्या मालिका सुरु होणार आहेत. झी मराठी वाहिनीवर येत्या काळामध्ये पाच नव्या मालिका सुरु होतील. या शर्यतीमध्ये स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. 

मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री नीना कुळकर्णी, अतिशा नाईक, पूजा बिरारी, विशाल निकम हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री पूजा बिरारी ही स्टार प्रवाहच्या स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. विशाल निकम हा स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत झळकला होता. वाहिनीकडून आता त्यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला असून याला ऐक ना जनाचं, ते ऐक ना मनाचं… असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 


कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संध्याकाळी 7.30 वाजता तर साधी माणसं ही मालिका संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेली आई कुठे काय करते या मालिकेला वाहिनीचा दुपारचा स्लॉट देण्यात आलाय. तसेच 7 वाजता लागणारी कुन्या राजाची गं तु राणी या मालिकेचा शनिवार 16 मार्च रोजी शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे आता या नव्या मालिकेसाठी कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की कोणत्यातरी मालिकेची वेळ बदलली जाणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Kunya Rajachi Ga Tu Rani : आज आमचा प्रवास इथेच संपतोय…, काही महिन्यांतच कुन्या गावाची गं तु राणी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कबीर-गुंजाची भावनिक पोस्ट

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *