‘पंचायत’, ‘कोटा फॅक्ट्री’ ते ‘Delhi Crime’; ओटीटीवर आताच पाहा ‘या’ मजेदार वेबसीरिज

'पंचायत', 'कोटा फॅक्ट्री' ते 'Delhi Crime'; ओटीटीवर आताच पाहा 'या' मजेदार वेबसीरिज

[ad_1]

OTT Web Series : कोरोनानंतर ओटीटीवर (OTT) चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्यातही ओटीटीवर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सिनेमागृहात जाऊन एखादी कलाकृती पाहण्यापेक्षा घरबसल्या कुटुंबासोबत चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडतं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक वेबसीरिज प्रेक्षक कितीही वेळा पाहू शकतात. यात ‘पंचायत’ (Panchayat), ‘दिल्ली क्राईम’ (Delhi Crime) ते ‘कोटा फॅक्ट्री’पर्यंत (Kota Factory) अनेक वेबसीरिजचा समावेश आहे.

कोटा फॅक्ट्री (Kota Factory)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स (Netflix)

‘कोटा’मधील विद्यार्थ्यांचं आयुष्य आयआयचीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीचा संघर्ष ‘कोटा फॅक्ट्री’ या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. राघव सुब्बू यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ‘कोटा फॅक्ट्री’ भारतातील पहिली ब्लॅक अँड व्हाईट वेब सीरिज होती. ही नाट्यमय, विनोदी मालिका प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

दिल्ली क्राइम (Delhi Crime)
कुठे पाहू शकता? नेटफ्लिक्स

‘दिल्ली क्राइम’ ही सीरिज 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दिल्लीतील गँगरॅप आणि हत्या याबद्दल या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं होतं. क्राईम-ड्रामा असणारी ही सीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 

बंदिश बँडिट्स (Bandish Bandits)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ

‘बंदिश बँडिट्स’ हा म्युझिकल रोमँटिक ड्रामा आहे. आनंद तिवारी यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ऋत्विक भौमिक आणि श्रेया चौधरी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.

पंचायत (Panchayat)
कुठे पाहू शकता? प्राईम व्हिडीओ

‘पंचायत’ या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव आणि नीना गुप्ता हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत अभिषेक त्रिपाठी नामक एका मुलाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात. आता या सीरिजच्या आगामी भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

ब्रोकन बट ब्यूटीफुल (Broken But Beautiful)
कुठे पाहता येईल? झी 5

‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ ही सीरिज 2018 मध्ये रिलीज झाली होती. या रोमँटिक सीरिजनी निर्मिती एकता कपूरने केली आहे. एक गोड प्रेमकथा असलेली ही सीरिज प्रेक्षकांना झी 5 वर पाहता येईल.

मेड इन हेवन (Made in Heaven)
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

‘मेड इन हेवन’ ही रोमँटिक नाट्य असणारी वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये तारा आणि करण यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.

संबंधित बातम्या

South Bold Actress : समंथा, तमन्ना ते कियारा आडवाणीपर्यंत! ‘या’ 5 वेबसीरिजमध्ये अभिनेत्रींनी सर्व मर्यादा ओलांडल्या!

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *