‘पुष्पा 2’संदर्भात मोठी अपडेट समोर; अल्लू अर्जुनचा आवाज बदलणार? श्रेयस तळपदे म्हणाला…

'पुष्पा 2'संदर्भात मोठी अपडेट समोर; अल्लू अर्जुनचा आवाज बदलणार? श्रेयस तळपदे म्हणाला...

[ad_1]

Shreyas Talpade on Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘पुष्पा’चा (Pushpa) पहिला भाग हिंदी पट्ट्यात चांगलाच चालला. हिंदी वर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याने (Shreyas Talpade) आवाज दिला होता.

‘पुष्पा 2’ला श्रेयस तळपदे आवाज देणार? (Shereyas Talpade on Pushpa 2)

श्रेयस तळपदे इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,”पुष्पा 2’साठी डबिंग करायला मला नक्कीच आवडेल. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर माझं काम म्हणजे डबिंग सुरू होईल. अद्याप निर्मात्यांसोबत याबद्दल माझं काहीही बोलणं झालेलं नाही. शूटिंग संपल्यानंतर निर्माते डबिंगसाठी विचारतील, अशा मला आशा आहे”. 

श्रेयस तळपदेला करायचंय डबिंग

श्रेयस तळपदे पुढे म्हणाला,”पुष्पा’साठी पुन्हा डबिंग करायला मला आवडेल. ‘पुष्पा 2’चा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. पण निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात अद्याप मला काहीही विचारणा केलेली नाही”. श्रेयस तळपदेच्या या वक्तव्यानंतर तो ‘पुष्पा 2’चा भाग होणार की नाही याबद्दल चाहत्यांना प्रश्न पडला आहे. आत या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये श्रेयस झळकणार की नाही हे जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक आहेत. अद्याप श्रेयसला या सिनेमासाठी विचारणा न झाल्याने ‘पुष्पा 2’चा आवाज बदलणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

इतिहास रचण्यासाठी ‘पुष्पा 2’सज्ज!

‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या सिनेमाने रिलीजआधीच ‘आरआरआर’,’साहो’ आणि ‘बाहुबली 2’ या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या सिनेमाचे ऑडिओ राईट्स 65 कोटींमध्ये विकले गेले आहेत. ‘पुष्पा: द रूल’ (Pushpa The Rule) या सिनेमात प्रेक्षकांना अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ‘पुष्पा 2’ या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच फहद फासिलदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची क्रेझ आजही कायम आहे. या सिनेमातील डॉयलॉग, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘पुष्पा 2’चा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी आता हा सिनेमा सज्ज आहे.

संबंधित बातम्या

Allu Arjun : झुकेगा नहीं साला! ‘पुष्पा 2’च्या रिलीजआधीच अल्लू अर्जुनने केली ‘Pushpa 3’ची घोषणा

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *