प्रभासला सोडलं अन् 10 वर्ष लहान उद्योगपतीला डेट करतेय कृती सेनन; मिस्ट्री मॅनचं ‘कॅप्टन कूल’ धोनीसोबत आहे खास कनेक्शन

Kriti Sanon : प्रभासला सोडलं अन् 10 वर्ष लहान उद्योगपतीला डेट करतेय कृती सेनन; मिस्ट्री मॅनचं 'कॅप्टन कूल' धोनीसोबत आहे खास कनेक्शन

[ad_1]

Kriti Sanon Rumoured Boyfriend : बॉलिवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या सिनेमात शेवटची झळकली होती. या रोमँटिक नाट्यमय सिनेमात कृती सेननसोबत शाहिद कपूर (Shahid Kapoor) मुख्य भूमिकेत दिसला होता. या सिनेमातील अभिनेत्रीने परफॉर्मेंसने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. कृती सेनन आपल्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. कृती तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळेदेखील अनेकदा चर्चेत आली आहे. कृतीचं नाव आधी ‘बाहुबली’ (Baahubali) फेम प्रभाससोबत (Prabhas) जोडलं जात होतं. आता तिचं नाव एका वेगळ्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे. बी-टाऊनमध्ये दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. आता कृती सेननचा रुमर्ड बॉयफ्रेंड नक्की कोण हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मिस्ट्री मॅनसोबतचा कृती सेननचा फोटो व्हायरल (Kriti Sanon Photo Viral)

कृती सेननचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या फोटोमध्ये कृती एका मुलाचा हात पकडून लंडनच्या गल्ल्यांमध्ये फिरताना दिसून येत आहे. कृतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर हा दुसरा-तिसरा कोणी नसून कृती सेननचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे, असं म्हटलं जात आहे. कृतीसोबत असलेल्या मुलाचं नाव ‘कबीर बहिया’ (Kabir Bahia) असं आहे. कबीर ब्रिटनमध्ये राहणारा आहे. कबीर हा कृतीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. कबीरचे वडिल लंडनचे एक लोकप्रिय उद्योगपती आहेत.

Kriti Sanon : प्रभासला सोडलं अन् 10 वर्ष लहान उद्योगपतीला डेट करतेय कृती सेनन; मिस्ट्री मॅनचं 'कॅप्टन कूल' धोनीसोबत आहे खास कनेक्शन

महेंद्र सिंह धोनीसोबत खास कनेक्शन

कृती सेननचं नाव कबीर बहियासोबत जोडलं गेलं आहे. कबीर बहिया आणि भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबत (Mahendra Singh Dhoni) कृतीचं नाव जोडलं गेलं आहे. महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनीसोबतच्या (Sakshi Dhoni) अनेक फोटोंमध्ये कबीर दिसून आला आहे. कबीर आणि साक्षीचं खास नातं आहे. अद्याप कृती सेनन किंव कबीर बहिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. कृती सेननचं नाव याआधी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत जोडलं गेलं होतं. प्रभास आणि कृती सेननच्या अफेअरच्या चर्चा ‘आदिपुरुष’ (Adipurush) या सिनेमाच्या सेटवर सुरू झाल्या होत्या. 

कृतीच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव 

कृती सेननच्या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कबीर भाऊ खूपच आकर्षक आहे, कृती आणि कबीर एकमेकांना डेट करत आहेत, कृतीला अखेर चांगला जोडीदार मिळाला आहे, कृतीच्या लग्नाची आता प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.  

कृती सेनन सध्या तिच्या ‘क्रू’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘क्रू’ या सिनेमात तब्बू, करीना कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना ती दिसणार आहे. राजेश कृष्णनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिया कपूर, एकता कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहित या सिनेमाचे निर्माते आहेत. 

संबंधित बातम्या

Crew Choli Ke Peeche song : ‘पुन्हा एका गाण्याची वाट लावली’, ‘चोली के पिछे क्या हैं’ गाण्यामधील करिनाच्या अंदाजावर प्रेक्षकांची नापसंती, माधुरीसोबत तुलना करत म्हणाले…

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *