बच्चन यांच्या घरी घुमणार सनई-चौघड्यांचे सूर! नव्या नंदा बांधणार या अभिनेत्यासोबत लग्नगाठ?

बच्चन यांच्या घरी घुमणार सनई-चौघड्यांचे सूर! नव्या नंदा बांधणार या अभिनेत्यासोबत लग्नगाठ?

[ad_1]

Amitabh Bachchan :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अंगणात पु्न्हा  एकदा सनई-चौघड्यांचे सूर घुमणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांच्या गदारोळात आता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्यासोबत ती विवाहबद्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

कोणत्या अभिनेत्यासोबत बांधणार लग्नगाठ?

बच्चन यांची नात नव्या नंदा ही नंदा सध्या तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमुळे खूप चर्चेत आहे. पॉडकास्ट दरम्यान, नव्याने आजी जया बच्चनला (Jaya Bachchan) लग्नाच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित विचारले होते.  जिवलग मित्राशी लग्न करणे ठीक आहे का? मैत्रीतील नाते हे रोमाँटिक होऊ शकेल का, असा प्रश्न विचारला. नातीच्या लग्नावर आजी जया बच्चनने ‘हो, का नाही.’ त्यावेळी श्वेता बच्चन-नंदा आपल्या मुलीला म्हणाली की,  ‘म्हणजे, तुला म्हणायचे आहे की, मैत्रीत तुझ्या मित्राविषयी भावना निर्माण झाल्या तर पुढे जावे का? तर हो… यात चूक काय आहे? कारण एकच आयुष्य आहे आणि तेही लहान आहे, असे सूचक वक्तव्य श्वेताने केले.  त्यानंतर नव्याच्या विवाहाची चर्चा रंगू लागली आहे. 

या पॉडकास्टनंतर नव्या नंदा लवकरच आपला खास मित्र आणि रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे वृत्त आहे. बच्चन कुटुंबियांनादेखील या विवाहावर कोणताही आक्षेप नाही. मात्र, या सगळ्या चर्चा असून दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नंदा यांनी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. सिद्धांतने ‘इनसाईड एज’ या वेब सीरिजमधील भूमिकेने लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात रणवीर सिंहसोबत त्याने काम केले होते. त्याच्या कामाचे कौतुक झाले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *