बिग बॉसच्या घरात जान्हवीच्या वागण्यामागचं खरं कारण समोर, नवऱ्यानेच केला खुलासा 

Jahnavi Killekar Husband Kiran Killekar reaction on her behaviour in Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi Entertainment news in marathi Jahnavi Killekar :

[ad_1]

Jahnavi Killekar : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) सध्या एक नाव सगळीकडे गाजतंय. इतकंच नव्हे तर तिच्या घरातील राड्यांमुळे रितेश भाऊंनी तिची भाऊच्या धक्क्यावरुन हकालपट्टी केली होती आणि तिला तुरुंगात राहायची शिक्षाही केली. ती स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर. घरातील प्रत्येकासोबतचं जान्हवीचं वागणं हे महाराष्ट्रालाच नाही तर कलासृष्टीतीलही अनेकांना पटलं नाही. त्यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली. इतकच नव्हे तर तिचा नवरा किरण किल्लेकरनेही तिच्या वागण्यावर भाष्य केलं. पण हे सगळं जान्हवी का वागली याचं कारणही आता तिच्या नवऱ्याने सांगितलं आहे. 

जान्हवीचा नवरा किरण किल्लेकर याने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये किरणने जान्हवी घरातल्यांसोबत अशी का वागते याचं कारण सांगितलं. त्याचप्रमाणे तिच्या काही गोष्टींचं समर्थनही केलं आणि तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तरही दिलं. यावेळी हा सगळा जान्हवीचा गेम प्लॅन असल्याचंही किरणने सांगितलं आहे. त्यामुळे घरातल्यांशी उगाच भांडणं करणं किंवा त्यांना काहीही बोलणं ही जान्हवीची खेळी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

‘मी पहिली जाऊन त्यांची माफी मागेन’

किरणने जान्हवीच्या खेळाविषयी सांगताना म्हटलं की, ‘जान्हवी मला म्हणाली होती, मी जर आतामध्ये गेले तर सगळ्यात आधी जे मजबूत खेळाडू आहेत, ते पाहीन. त्यानंतर जे वीक आहे, त्यांना समजून घेईन. कारण तिथे सगळ्यांशी भांडावं लागेल. मी तिला तेव्हा म्हटलं होतं, की तू काहीही कर, पण तिथे मोठे कलाकारही आहेत. वर्षाताई आहेत, पॅडीदादा आहेत. त्यावर तिने म्हटलं होतं की, मी स्वत:हून कोणाकडे जाणार नाही. पण कुणी माझ्याशी भांडलं तर आणि मी रागाच्या भरात काही बोलून गेले तर पहिली जाऊन माफी मागेन.’

‘मी स्वत:काहीतरी कारण काढून भांडेन’

पुढे त्याने म्हटलं की, ‘तिने म्हटलं होतं, एखादा खेळाडू मला वीक वाटला तर मी त्याच्यासोबत स्वत:हून काहीतरी कारण काढून भांडेन.सूरजलाही जेव्हा ती बोलली तेव्हा त्याची चूक होती की नाही, हे कुणी पाहिलं नाही. पण जान्हवी बोलली म्हणून सगळे पेटले. त्यानंतर वर्षाताईंना बोलली. त्यावर तिने मान्यही केलं की मुद्दाम केलं.’

‘तिचं बोलणं मलाही पटलं नाही’

पॅडीदादाला जे ती बोलली ते फारच चुकीचं बोलली. त्यावर मी प्रतिक्रिया देताना म्हटलंही होतं, की तुम्ही जान्हवीला बोलताय,मी मान्य करतो. ती खूप चुकीचं वागली आहे. पण एवढंही नका बोलू. तुम्ही माझ्या मुलाला बोलताय, वाट्टेल तसं बोलताय. तेवढं नका करु. तुम्हाला वाटतंय ती चुकली आहे, तुम्ही तिला शिव्या घाला. पण अशा पद्धतीने नाही. अगदीच घाण तुम्ही बोलताय. जान्हवी दुसऱ्याला हिरो बनवायला गेली आणि स्वत: विलन झाली. ज्यांनी तिच्यासोबत कधी कामंही केलं नाही, तेही तिला आता बोलतायत. 

ही बातमी वाचा : 

Rajkummar Rao Maalik : ‘मालिक’ राजकुमार रावची पहिली झलक, वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांसाठी खास भेट

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *