[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) अखेर विवाहबंधनात अडकली असल्याचे वृत्त आहे. (pc:taapsee/ig)

तापसीने उदयपूर (Udaipur) येथे गुपचूपपणे लग्नगाठ बांधली आहे. जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये 23 मार्च रोजी हा विवाहसोहळा पार पडला.(pc:taapsee/ig)

टीम इंडियाचा बॅडमिंटन दुहेरी संघाचा प्रशिक्षक असलेला प्रियकर मॅथियास बो (Mathias Boe) सोबत तिने विवाह केला. तापसी ही प्रियकर मॅथियाससोबत मागील 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.(pc:taapsee/ig)

कुटुबांशी निगडित असलेल्या सूत्रांनी माहिती दिली की, दोघांचे विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला. हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. (pc:taapsee/ig)

लग्नाशी संबंधित कार्यक्रम हे 20 मार्चपासून सुरू झाले होते. आपल्या लग्नाची मीडियामध्ये चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही जोडप्यांनी खबरदारी घेतली होती. हे दोघेही मीडिया आणि लाइमलाइटपासून अंतर ठेवणारे असल्याचेही या सूत्राने म्हटले. (pc:taapsee/ig)

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तापसी पन्नूच्या या विवाह सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. (pc:taapsee/ig)

सिनेइंडस्ट्रीमधून अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लो यानांच आमंत्रित करण्यात आले होते. अनुराग कश्यपने तापसीची भूमिका असलेल्या मनमर्जियां, दोबारा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. (pc:taapsee/ig)

प्रियकर मॅथियास बो हा डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू आहे. मॅथियासने 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. (pc:taapsee/ig)

2015 च्या युरोपियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. मॅथियास हा सध्या भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचा प्रशिक्षक आहे. तापसी पन्नू ही केवळ हिंदीच नाही तर तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. (pc:taapsee/ig)
Published at : 25 Mar 2024 04:20 PM (IST)
करमणूक फोटो गॅलरी
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link