भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडविणारा ‘तो’ नक्की कोण? समोर आली मोठी माहिती

[ad_1]

Chhagan Bhujbal : नाशिकमधील लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रणशिंग फुंकले आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळ फार्मवर (Bhujbal Farm) ड्रोन फिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता ड्रोन (Drone) नक्की कोणी फिरवला याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भुजबळ फार्मवर ड्रोन उडविण्यात आला होता. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याबाबत भुजबळ फार्मवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांकडून (Ambad Police) भुजबळ फार्मची पाहणी करून भुजबळ फार्मबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा निघाला फोटोग्राफर

आता भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा एक फोटोग्राफर (Photographer) असल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित पवन राजेश सोनी (29, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविला होता, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे (Kiran Raundle) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

नाशिक लोकसभेसाठी नक्की कोणाला उमेदवारी? 

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. मात्र आता महायुतीकडून भुजबळ, गोडसे यांच्या व्यतिरिक्त पर्याय शोधला जात आहे. भाजप आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता महायुतीतून नाशिक लोकसभेसाठी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता? जरांगेंनी नाशकातून भुजबळांवर डागली तोफ!

‘तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू’, ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *