मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्यानं  जरांगेंना सलाईन

[ad_1]

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा लढा सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. दरम्यान खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आज सलाईन लावलंय. शरीरातील पाणी पातळी कमी होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली. तसच तेथील सुरक्षेचा आढावा देखील घेतला. 

आंदोलक आणि पोलिसांमध्ये उद्भवलेल्या संघर्षानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमधील अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली.  मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली.  दरम्यान आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे लाठीमार यासंबंधी मनोज जरांगे आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली

29 ऑगस्ट च्या दिवशी पैठण फाटा येथे मनोज जरांगेनी आंदोलनाची हाक दिली होती. 31 ऑगस्टला मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असल्याचं सांगत पोलिसांचाआंदोलनात हस्तक्षेप केला. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. आंदोलकांची तब्येत खालावत असल्याने वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. पहाटे अडीच वाजता गावात अचानक पोलिसांचा  मोठा फौजफाटा शिरला. पोलिसांची दडपशाही होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. 1 सप्टेंबरला पोलीस, महसूल प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चार ते साडेपाचपर्यंत आंदोलकांची समन्वय समिती आणि प्रशासनामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात दोनदा चर्चा झाली पण ती निष्फळ ठरली. पावणे सहा वाजता आंदोलनस्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा शिरला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी लाठीमार सुरू केला . दुसऱ्या बाजूने संतप्त ग्रामस्थ आणि
आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फेकलेयपावणे सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली. 

कोण आहे मनोज जरांगे?

मनोज जरांगेंचं वय  41 वर्ष आहे.  मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात.  गेली 20 वर्ष आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केली. 2012 साली शहागड येथे त्यांनी  सात दिवसाचा आमरण उपोषण केलं . 2013 ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  सहा दिवस उपोषण केलं . अंबड तहसील कार्यालयसमोर अकरा वेळा उपोषण केले. गेल्या दोन वर्षात जालनातील साष्टपिंपळगाव, भांबेरी ,वडीकाळ्या आमि आत्ता अंतरवली सराटीत गेल्या नवव्या दिवसांपासून उपोषण सुरु होतं. मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मोर्चा जो छत्रपती संभाजीनगर मध्ये निघाला होता त्यामध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

हे ही वाचा:

 मराठवाड्यातील मराठ्यांनी काय वाईट केलं?; चर्चेसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगेंचा सवाल

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *