मविआतील जागावाटपाचा तिढा सुटणार? जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत बैठकीचं आयोजन

[ad_1]

Maha Vikas Aghadi Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर एकीकडे सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जात आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा (MVA Seat Sharing) अद्याप कायम आहे. मविआतील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी आज दिल्लीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मविआतील वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी (Mahavikas Aghadi Seat Sharing) आज दिल्लीत (Delhi) महत्त्वाची बैठक (Meeting) बोलावण्यात आली आहे.

जागावाटपाचा तिढा आज सुटणार?

मविआतील जागावाटपाचा तिढा आता सुटणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांची आज दिल्ली जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठक पार पडणार आहे. मविआतील वादग्रस्त जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीत बैठक पार पडणार आहे. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थित ही बैठक पार पडेल.

मविआमध्ये काही जागांवरुन रस्सीखेच

महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन रस्सीखेच सुरु आहे. हा वाद मिटवण्यासाठीच दिल्लीत बैठकीचं आयोजन कऱण्यात आलंय..यापूर्वी मुंबईतीली ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली होती.. त्यावेळी जागावाटपाच्या तिढ्यावर तोडगा न काढता निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली होती. प्रचार कसा करायचा? कुठले मुद्दे घ्यायचे यावर चर्चा झाली होती. आता मात्र जागावाटपाच्या तिढ्यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय.

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *