मुंबईतील अंधेरी महिलेचा दोन मित्रांसह धिंगाणा, नशेत तीन पब कर्मचारी आणि सात पोलिसांना मारहाण

[ad_1]

मुंबई : मुंबईतील अंधेरी पश्चिमेत (Andheri) आंबोलीत नशेत असलेल्या महिलेने तिच्या दोन मित्रांसह धिंगाणा घालत आधी पब कर्मचाऱ्यांना मग सात पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंबोली पोलीस स्टेशनच्या (Amboli Police Station) हद्दीतील ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पबमध्ये हा प्रकार समोर आला.

आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धिंगाणा करणारी महिला आपल्या दोन मित्रासोबत ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पबमध्ये आली होती. मात्र मध्यरात्री दोन वाजता महिलेने पब कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने कोणत्या कारणामुळे मारहाण केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पब कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पोलिसांना कॉल केला. आंबोली पोलिसांची गाडी तिथे पोहोचल्यानंतर त्यात असलेले ASI आणि पोलीस कॉन्स्टेबलला महिला आणि त्याच्या दोन्ही साथीदारांकडून मारहाण करण्यात आली. महिला आणि तिच्या साथीदारांनी पोलिसांना कानाखाली मारली.

महिला पोलिसाचा चावा घेतला

यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती आंबोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर नाईट ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक मुकुंद यादव हे महिला अधिकाऱ्यांसोबत बीट मार्शलची गाडी घेऊन पबला पोहोचले. महिलेने पोलीस निरीक्षक मुकुंद यादव यांच्यावरही हल्ला केला. महिलेने मुकुंद यादव यांना मारहाण केली. सोबतच या महिलेने पोलीस अधिकारी महिलेचा चावा घेतला, यात त्यांना दुखापत झाली आहे.

महिलेच्या हल्ल्यात सात पोलिसांसह दहा जण जखमी

धिंगाणा करणाऱ्या महिलेचा हल्ल्यामध्ये सात पोलीस अधिकारी आणि पबचे तीन कर्मचारी असे एकूण दहा जण जखमी झाले आहेत. महिलेच्या संपूर्ण हायवोल्टेज ड्रामा पबमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आंबोली पोलिसांनी ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ या पबचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतलं आहे. आंबोली पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून महिला आणि तिच्या दोन साथीदाराला ताब्यात घेतलं आहे. आंबोली पोलिसांनी संबंधित महिला आणि साथीदारांची वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी आंबोली पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. तसंच आंबोली पोलिसांनी पबमध्ये धिंगाणा करणारी महिलेच्या दोन गाड्या जप्त केली आहे.

हेही वाचा

Mumbai News : मुंबईतील अंधेरीत कामगाराचा मृत्यू गावठी दारुमुळे नाही तर फूड पॉयझनिंगमुळे, फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न; चौघांवर उपचार सुरु

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *