पोलीस शिपाई भरतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
अहमदनगर : पोलीस शिपयाची भरतीसाठी आतापर्यंत नेहमीच मैदानी चाचणी अगोदर घेण्यात आल्या आहेत. परंतु राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाच्या विभागाच्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. पोलीस शिपयाच्या भरतीसाठी अगोदर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थी उमेदवारांचा फायदा होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.
पोलीस, लष्करात भरतीसाठी अगोदर मैदानी चाचणी घेतली जाते. परंतु राज्य सरकराच्या गृह विभागाने 18 जानेवारी 2019 भरती प्रक्रियेत बदल केला आहे. पोलीस शिपयांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची सुरूवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ सुरू राहणारी भरती प्रक्रिया जलद गतीने होईल. जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना या नव्या भरती प्रक्रियेचा फायदा होणार आहे. त्यांना संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत थांबावे लागणार नाहीत, अशी माहिती रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे.