मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर

[ad_1]

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.  कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती. 

ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी

  • कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर 
  • हातकणंगले – सत्यजीत पाटील
  • पालघर – भारती कामडी
  • जळगाव – करण पवार 

भाजपचा विद्यमान खासदार ठाकरे गटात

दरम्यान, भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात दाखल झाले आहेत. आजच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेश पाटील यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. त्यामुळे उन्मेश पाटील यांनी थेट भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला.  त्यांना जळगावातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ठाकरेंनी करण पवार यांना जळगावातून मैदानात उतरवलं आहे.

ठाकरे गटाची पहिली यादी

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जणांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनंत गिते, अनिल देसाई, अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, राजन विचारे, अमोल किर्तीकर यांची नावं होती.  

ठाकरे गटाची उमेदवार यादी  

बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्गरत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई 

संबंधित बातम्या  

Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *