[ad_1]
मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून एकनाथ शिंदेंच्या सहा खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. हिंगोलीमध्ये हेमंत पाटील आणि हातकणंगल्यामधून धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या नावाला भाजपचा विरोध लक्षात घेता हे दोन्ही उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर येणार असल्याची माहिती आहे. त्यातच आता धैर्यशील मानेंच्या ठिकाणी त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं समोर येतंय.
शिवसेना शिंदे गटाकडून राज्यातल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश होता. या दोन्ही नावांना भाजपचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणचे उमेदवार मागे घेण्यात येणार असून त्या ठिकाणी नवीन चेहरे देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.
निवेदिता माने निवडणूक लढवणार?
धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेऊन त्या ठिकाणी माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली शिंदे गटात सुरू असल्याची माहिती आहे. निवेदिता मानेंनीही त्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. निवेदिता माने या धैर्यशील माने यांच्या आई असून त्यांनी या आधी दोन वेळा हातकणंगले मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.
अधिक पाहा..
.
[ad_2]
Source link