मोदीला शिव्या पडतात म्हणजे स्पष्ट आहे, फिर एक बार…, नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

[ad_1]

नागपूर: तुम्हाला यंदा फक्त खासदार निवडायचा नाही तर पुढच्या हजार वर्षाच्या मजबूत भारताचा पाया रचायचा आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशातील ओबीसी, एससी आणि एसटी लोकांकडे दुर्लक्ष केलं, पण गेल्या दहा वर्षात त्यांच्यासाठी अनेक कामं होऊन त्यांच्या भवितव्याची नवीन मार्ग सुकर झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. गेल्या दहा वर्षात फक्त जेवणापूर्वी जे समोर येतं ते अॅपेटायझर आलं आहे, आता विकासाची पूर्ण थाळी समोर यायची आहे असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले होते. 

माध्यमांद्वारे अनेक सर्व्हे केले जातात, पण त्यामध्ये पैसे कशाला वाया घालवताय? कारण ज्यावेळी मोदीला शिव्या पडतात त्या वेळी पुन्हा एकदा भाजपच सत्तेत येतं असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

प्रभू श्रीरामाच्या पावन भूमीमध्ये रघुजी भोसले राजांच्या शौर्याने गाजलेल्या रामटेक भूमीला नमस्कार अशी मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात केली. ते म्हणाले की, तुम्हाला यंदा फक्त खासदार निवडायचा नाही तर पुढील एक हजार वर्षांच्या मजबूत भारतासाठी पाया रचायचा आहे. मीडिया सर्व्हेमध्ये एनडीएचा बंपर विजय दाखवला जात आहे. कशाला सर्व्हे करता? जेव्हा मोदीला शिव्या वाढतात, म्हणजेच ‘फिर एक बार..’ जेव्हा मोदींच्या आई वडिलांना शिव्या वाढतात, म्हणजेच पुन्हा एकदा आमचीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट आहे.

गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाल्याने काँग्रेसच्या पोटात दुखतंय

संविधान धोक्यात आल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आणीबाणीच्या काळात संविधान धोक्यात आला नव्हता का? जेव्हा गरिबाचा मुलगा पंतप्रधान झाला सविंधान आणि लोकशाही धोक्यात आली? इंडी आघाडीला गरिबांची प्रगती आवडत नाही.
 
माझे देशातील नागरिकांना म्हणणे आहे एकसंघ होऊन देशासाठी मतदान करा. हे इंडी आघाडीवाले वाढले तर हे देश तोडतील. रामटेक ते स्थान आहे, जिथे प्रभू रामाचे पाय पडले होते. यंदा रामनवमीला आमचे रामलल्ला झोपडीमध्ये नाही तर भव्य मंदिरात दर्शन देणार आहे. 500 वर्षानंतर हा क्षण आला आहे. मात्र हे विसरू नका, जेव्हा अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली, तेव्हा विरोधकांनी  त्यावर बहिष्कार टाकला, त्यांनी निमंत्रणही नाकारले. महाराष्ट्रात या इंडी आघाडीला एकही जागा जिंकू देऊ नका. 

काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण संपवले, त्यांना भारतरत्न दिलं नाही असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. आमच्या सरकारने एका दलित आणि आदिवासीला राष्ट्रपती बनविले, एनडीए सरकारने ओबीसी मंत्रालय निर्माण केलं. सरकारच्या विकास योजनांचे सर्वात जास्त लाभार्थी अनुसूचित जाती आणि जमातीतील आहेत असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

आम्ही 370 कलम हटवलं

काँग्रेसने एक देश, एक संविधान लागू होऊ दिले नाही आणि आज ते संविधानाच्या नावाने खोटं बोलत आहे. जर काँग्रेसचे बाबासाहेबांच्या संविधानावर एवढे प्रेम होते, तर त्यांनी का बाबासाहेबांचे संविधान पूर्ण देशात लागू लागू केलं नाही? काश्मीरला त्यातून का वगळलं?  आम्ही बाबासाहेबांचे संविधान काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लागू करून दाखविलं, 370 कलम हटवून दाखवले. काश्मीरमध्ये संविधान लागू करून दाखवले.  

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *