मोहिते पाटलांचे पत्ते गुलदस्त्यातच! मैदानात उतरण्याचा इरादा पक्का, पण भाजपला कसा देणार धक्का? 

[ad_1]

Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारीवरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. यामुळं भाजपमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता देखील निर्माण झालीय. यातील एक मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा. या मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (Ranjeetsingh Nimbalkar) उमेदवारी दिलीय. त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) नाराज झाले आहे. मोहिते पाटील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत संभ्रम कायम आहे.

मोहिते पाटलांचा मतदारसंघात गावोगावी दौरा

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी उमेदावरी जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रचाराला गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी बैठकांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकड धैर्यशील मोहिते पाटील यांचाही माढा मतदारसंघात दौरा सुरु झाला आहे. मोहिते पाटील जुन्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेत आहेत. मोहिते पाटलांनी निवडणूक लढवावी, असा गावोगावचे कार्यकर्ते आग्रह धरत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन शरद पवार गटाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहे. दरम्यान, धैर्यशील हे गावोगावी दौरे करत असतानाच दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या ‘शिवरत्न’ या निवासस्थानी बैठका घेत आहेत. 

मोहिते पाटील कोणाकडून निवडणूक लढवणार?

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे जरी गावोगावी दौरा करत असले आणि कार्यकर्ते जरी त्यांना हाती तुतारी घेण्याची विनंती करत असले तरी त्यांनी अद्याप त्यांनी पत्ते खुले केले नाहीत. कोणाकडून निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी अद्याप कोणतही वक्तव्य केलं नाही. जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी माढा मतदारसंघात मी दौरा करत असल्याचे धैर्यशील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. मात्र, त्यांच्याबाबात कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेणार? खरंच निवडणूक लढवणार का? कोणत्या पक्षाकडून ते मैदानात उतरणार असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. 

रणजितसिंह निंबाळकरांना सहापैकी पाच आमदारांचा पाठिंबा

माढा लोकसभा मतदारसंघात सहा तालुके आहेत. यापैकी माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे, करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजयमामा शिंदे, सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम सातपुते आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा पाठिंबा रणजितसिंह निंबाळकरांना आहे. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांना माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांचा सपोर्ट असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या मर्जीतले फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला दीपक चव्हाण उपस्थित होते. त्यामुळं ते मोहिते पाटील यांना पाठिंबा देतील अशी देखील चर्चा सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या:

इतिहासाची पुनरावृत्ती होणार? माढ्यात ‘कमळानं’ डावललं, मोहिते पाटील हाती ‘तुतारी’ घेणार का?

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *